Prepare time: 15 min
Cook: 15-20 min
Ready in: 30 min
Ingredients
- किसलेला कोबी - 1 कप
- उकडलेले बटाटे - 2 ते 3
- लाल लिखट - 1 चमचा
- हळद - अर्धा चमचा
- धणे पूड - अर्धा चमचा
- जिरे पूड - अर्धा चमचा
- तांदळाचे पीठ - 2 चमचे
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- मैदा - 1 चमचा
- पाणी
- ब्रेड क्रम्प्स
- तेल
- मीठ - चवीनुसार
Directions
- एका भांड्यात एक कप किसलेला कोबी घ्यावा, त्यात पाणी नसेल याची खात्री करावी.
- यानंतर त्यात दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे स्मॅश करावेत.
- यानंतर त्यात एक चमचा लाल तिखट, हळद, धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला, तांदळाचे पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करून त्याचा गोळा करून घ्यावा.
- आता तयार पीठाचे हव्या त्या आकाराचे कटलेट बनवून घ्यावेत.
- तयार कटलेट मैद्याच्या मिश्रणात घोळवावे.
- यानंतर कटलेट ब्रेड क्रम्प्समध्ये घोळवून डिप फ्राय करून तळून घ्यावेत.
- तुमचे झटपट तयार होणारे कोबी -बटाटा कटलेट तयार झाले आहेत.