Prepare time: 10 min
Cook: 10 -12 min
Ready in: 15 min
Ingredients
- कांदा - 1 बारीक चिरेलेला
- आल्याचा तुकडा
- लसणाच्या पाकळ्या - 4 ते 5
- हिरवी मिरची - 2
- तूप
- बारीक चिरलेल्या भाज्या - आवडीनुसार
- नाचणीचे पीठ
Directions
- सर्वात आधी अंदाजानूसार, एका कढईत तूप घालावे. तूपात कांदा, लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, हिरवी मिरची परतवून घ्यावी.
- यात सर्व भाज्या टाका. यात तुम्ही गाजर, टोमॅटो, हिरवे वाटाणे देखील घेऊ शकता.
- मिश्रणात आता पाणी टाकून चवीनुसार मीठ घाला.
- पाणी घातल्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्या.
- यानंतर नाचणीच्या पिठात पाणी घालून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी.
- तयार पेस्ट सूपमध्ये मिक्स करावी. सूप जास्त जाडसर होत असेल तर त्यात गरजेनूसार पाणी टाकू शकता.
- सर्व मिश्रण एकजीव करुन घ्यावे.
- तुमचे नाचणीचे हेल्दी सूप तयार झाले आहे. सर्व्ह करताना कोथिंबीर घालायला विसरू नका.