Prepare time: 20 min
Cook: 10 min
Ready in: 30 min
Ingredients
- उकडलेला राजमा - 2 वाटी
- उकडलेले मटार - 2 वाटी
- चिरलेला गाजर - 2 वाटी
- उकडलेला बटाटा - 1 ते 2
- आल्याचा तुकडा
- कांदा - 1
- हिरव्या मिरच्या - 2
- भाजलेले बेसन - 2 चमचे
- चाट मसाला
- गरम मसाला
- काळी मिरीपूड
- तेल
- कोथिंबीर
- मीठ
Directions
- गाजर आणि उकडलेले बटाटे किसून घ्यावेत.
- एका बाऊलमध्ये राजमा, मटार एकत्र करुन घ्यावे.
- यानंतर त्यात कांदा, बटाटा, गाजर, बेसन घालावे आणि एकजीव करुन घ्यावे.
- सर्व मसाले, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालावे.
- तयार मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि हाताने टिक्कीसारखे सपाट करावेत.
- यामुळे टिक्कीचा आकार तयार होईल.
- तव्यावर तेल टाका , तेल गरम झाल्यावर टिक्की शॅलो फ्राय करुन घ्याव्यात.
- तयार टिक्कीवर कोथिंबीर टाकावी.
- गरमा गरम टिक्की हिरवी चटणी, सॉससोबत सर्व्ह करावी.