Prepare time: 10 min
Cook: 15-20 min
Ready in: 30 min
Ingredients
- सोया चंक्स - 1 कप
- मैदा - 2 ते 3 चमचे
- कॉर्नफ्लॉवर - 2 चमचे
- आले-लसूण पेस्ट - 1 चमचा
- लाल तिखट - 1 चमचा
- दही - 1 चमचा
- चिरलेली कोथिंबीर
- लिंबाचा रस
- तेल
- मीठ
Directions
- सोया चंक्स उकळलेल्या पाण्यात 5 ते 10 मिनिटे टाकून झाकून ठेवावेत.
- 5 ते 10 मिनिटानंतर सोया चंक्स पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत आणि त्यातील पाणी पूर्णपणे काढावेत.
- यानंतर मिक्सरमध्ये सोया चंक्स वाटून घ्यावेत.
- तयार मसाला एका बाऊलमध्ये काढून घ्यावा.
- या मसाल्यात आले-लसूण पेस्ट आणि सर्व मसाले घालून एकजीव करून घ्यावे. चवीनुसार मिश्रणात मीठ टाकावे.
- सर्वात शेवटी लिंबाचा रस टाकावा आणि सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
- यानंतर मिश्रणात कॉर्नफ्लॉवर, मैदा एकत्र करून व्यवस्थित मळून घ्यावा.
- तयार मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स तयार करावेत.
- गॅसवर कढईत तेल तापण्यास ठेवावे. तेल तापले की, गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
- तयार बॉल्स लालसर रंगाचे होईपर्यत तळून घ्यावेत.
- खाण्यासाठी झटपट तयार होणारे सोया चंक्स बॉल तयार झाले आहेत.
- तुम्ही टोमॅटोसॉससोबत किंवा खोबऱ्याची चटणीसोबत सोया चंक्स बॉल्स खाऊ शकता.