Prepare time: 10 min
Cook: 25 - 30 min
Ready in: 30 min
Ingredients
- कोथिंबीर
- आलं-लसूण पेस्ट - अर्धा चमचा
- हिरवी मिरची - 2
- पांढरे तीळ- 1 चमचा
- हळद
- लाल तिखट
- हिंग
- शेंगदाण्याचे कूट1 चमचा
- जिरे
- तांदळाचे पीठ - 1 वाटी
- बेसन - 2 चमचे
- ओवा
- तेल
- साखर
- पाणी
Directions
- सर्वात पहिले कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यावी आणि बारीक चिरावी. यानंतर आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या ठेचून घ्याव्यात.
- चिरलेल्या कोथिंबीरमध्ये एक चमचा पांढरे तीळ, हळद, लाल तिखट, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करुन घ्यावे.
- यात शेंगदाण्याचे कुट, जिरे, ओवा आणि थोडे तेल, साखर टाकून मिक्स करावे.
- नंतर वरील मिश्रण एकजीव करा आणि त्यात तांदळाचे पीठ थोडे बेसन घालून पुन्हा मिक्स करून घ्यावे. पाणी जास्त वापरू नये.
- आता याचा गोळा तयार करून घ्यावा. तुम्ही पिठाचे लांबट आकाराचे गोळे तयार करून घेऊ शकता.
- चाळणीला हाताने तेल लावून घ्यावे.
- आता वडी वाफेवर 20 मिनिटांसाठी शिजवून घ्यावी.
- वड्या 20 ते 25 मिनिटानंतर थंड झाल्यावर सुरीने कट करुन घ्यावी.
- तयार वड्या तळून घ्याव्यात अथवा शॅलो फ्राय देखील करता येतील.