पती-पत्नीच्या नात्यात रुसवा, फुगवा, राग, लोभ, आनंद असं सर्व काही असतं. असं म्हणतात दोघांच्या नात्यात रुसवा, फुगवा नसेल तर प्रेम राहत नाही. नाते मजबूत होत नाही. त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यात छोट्या-मोठ्या कुरबुरी होणं स्वाभाविक मानले जाते. काही वेळा मात्र या छोट्या-मोठ्या कुरबुरीचं रूपांतर मोठ्या वादात होते आणि नात्यावर याचा परिणाम होण्यास सुरूवात होते. अशावेळी तुम्ही वास्तूचा सोपा उपाय करायला हवा. पती-पत्नीचं नातं मजबूत होण्यासाठी बेडरुममध्ये मोरपंख ठेवणे फायदेशीर ठरेल. बेडरुममध्ये मोरपंख ठेवल्याने चमत्कारीक फायदे होतात.
मोरपंख ठेवण्याचे फायदे –
- शास्त्रानुसार, घराच्या नैऋत्य कोपऱ्यात मोरपंख ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे नात्यात स्थिरता येते आणि पती-पत्नीचें नाते अधिक दृढ होते.
- मोरपंख बेडरुममध्ये ठेवल्याने पती-पत्नीमधील परस्पर समजूतदारपणा वाढतो, ज्यामुळे वाद होत नाहीत.
- बेडजवळ असणाऱ्या टेबलावर तुम्ही मोरपंख ठेवू शकता.
- पती-पत्नीच्या नात्यात सतत वादविवाद होत असतील तर उशीखाली मोरपंख ठेवावा. काही दिवस वास्तूचा उपाय केल्यास दोघांमधील भांडणे कमी होऊन प्रेम वाढण्यास मदत होते.
- पत्नी ज्या बाजूला झोपते, त्या दिशेला मोरपंख ठेवल्यास पतीपत्नीचे नाते आणखी मजबूत होते.
- वास्तूशास्त्रानुसार, मोरपंखांमध्ये नैसर्गिक ऍटी-मायक्रोबिअल घटक आढळतात. या घटकांमुळे बेडरुममधील वातावरण स्वच्छ आणि निरोगी होते.
- मोरपंखामुळे बेडरुममधील वातावरण शांत होते. असे शांत, आनंददायी वातावरण दोघांमधील प्रेम वाढते.
- मोरपंख झोपताना डोक्याजवळ ठेवल्याने ताण कमी होऊन झोपेची गुणवत्ता सुधारते.
- मोरपंख बेडरुममधील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.
ही काळजी घ्यावी –
- मोरपंख घरात ठेवताना खराब नसेल याची काळजी घ्यावी.
- मोरपंख प्लास्टिकचा नसेल याची खात्री करावी.
- बेडरुममध्ये मोरपंख ठेवण्यापूर्वी, काहीवेळ सूर्यप्रकाशात किंवा देव्हारात ठेवावेत. यामुळे अधिक सकारात्मक परिणाम दिसतात.
हेही पाहा –