Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min
Ingredients
- इडल्या – 4 ते 5
- मीठ - चवीनुसार
- लाल मिरची पावडर - 1/2 टीस्पून
- भाजलेली जिरे पावडर- 1/4 टीस्पून
- तांदूळ पीठ - 1 टेबलस्पून
- मोहरी - 1 टीस्पून
- दही - 2 टेबलस्पून
- तेल- तळण्यासाठी
- आले - 1 इंच
- लसूण पाकळ्या - 3 ते 4
- कढीपत्ता - 6 ते 7
- बडीशेप - 1/2 टीस्पून
- मोहरी - 1/2 टीस्पून
- संपूर्ण मिरची - आवडीनुसार
- काळी मिरी - 1/4 टीस्पून
Directions
- इडली 65 बनवण्यासाठी प्रथम इडलीचे चार तुकडे करून एका भांड्यात घ्या आणि त्यावर मीठ, मिरची, भाजलेले जिरे आणि तांदळाचे पीठ घाला.
- आता सर्वकाही चांगले मिसळा. नंतर त्यात दही घालून हलक्या हाताने मिक्स करा.
- यानंतर कढईत तेल घेऊन त्यात मोहरी आणि बडीशेप घाला.
- नंतर कढीपत्ता आणि चिरलेले आले व लसूण घाला. थोडं तळल्यावर त्यात दही घालून मिक्स करा.
- नंतर त्यात धणेपूड, तिखट, थोडे जिरे आणि थोडी हळद घालून मिक्स करा.
- नंतर त्यात इडली मिक्स करून चवीनुसार मीठ टाका आणि शेवटी काळी मिरी घाला.
- तुमची इडली 65 तयार आहे. कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करा.