हिंदू धर्मात गायीची पूजा केली जाते. पौराणिक कथांनुसार, मनोवाच्छित इच्छा पूर्ण करणारी गाय म्हणजे कामधेनू गाय. कामधेनू गाय विपूलता, समृद्धीचे प्रतिक मानले जातात. शास्त्रानुसार, कामधेनू गायीची मूर्ती घरात ठेवल्यास कुटूंबियासह घराची भरभराट होते. त्यामुळे कामधेनू गायीची मूर्ती घरात नक्की ठेवावी असावी असे सांगितले जाते. पण, कामधेनू गायीची मूर्ती घरात कुठेही ठेवू नये, योग्य ठिकाणीच ठेवावी.
कामधेनूची पूजा –
कामधेनू गायीची पूजा शुक्रवारी करणे शुभ मानले जाते. या गायीची पूजा करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे देवी लक्ष्मीसोबत होम करावा.
कोणत्या दिशेला ठेवावी कामधेनू मूर्ती –
कामधेनू गायीची मूर्ती घरात ठेवण्यासाठी ईशान्य दिशा योग्य समजली जाते. या दिशेला देव-देवतांचा वास असल्याने कामधेनू गायीची मूर्ती या दिशेला ठेवणे योग्य मानले जाते. त्यामुळे घरात कामधेनू गायीची मूर्ती या दिशेला तुम्ही ठेवू शकता, असे करणे शुभ राहील.
ऑफिसमध्ये मूर्ती कुठे ठेवाल –
कामधेनू गायीची मूर्ती ऑफिसमध्ये ठेवल्याने व्यावसायाची प्रगती होते. तुम्ही ऑफिसमध्ये उत्तर- पूर्व दिशेला मूर्ती ठेवू शकता. या दिशा संपत्ती, समृद्धीची देवता कुबेराशी संबंधित आहे. कामाच्या ठिकाणी कामधेनूची मूर्ती या दिशेला ठेवल्यास त्याचा उत्तम लाब होतो.
कामधेनू गायीची मूर्ती घरात ठेवण्याचे फायदे –
- कामधेनू गायीला समृद्धीचे प्रतिक मानले जाते. कामधेनू गाय घरात ठेवल्याने प्रगतीतील अडी-अडचणी दूर होतात.
- कामधेनू गायीची मूर्ती घरातील वास्तूदोष दूर करते आणि कुटूंबियांमध्ये प्रेम वाढते.
- असे म्हणतात की, कामधेनू गायीची मूर्ती ज्या घरात असते, तेथे पैशांची कमतरता जाणवत नाही.
- घराच्या प्रवेशद्वारावरही तुम्ही कामधेनू गायीची मूर्ती ठेवू शकता, अशे केल्यान घरात सुख-शांती नांदते.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde