हिंदू धर्मात मकर संक्रात हा महत्वाचा सण आहे. वर्षाचा पहिला सण मकर संक्रात असतो. यंदा 14 जानेवारीला मंगळवारी मकर संक्रात साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान सूर्य 09.03 वाजता मकर राशीत प्रवेश करेल.
मकर संक्रांतीला पतंग उडवले जातात. यासोबत आणखी एक गोष्ट करण्यात येते ती म्हणजे तिळाचे लाडू बनवले जातात. या दिवशी तिळाचे लाडू बनवण्याची परंपरा आहे. पण, मकर संक्रातीलाच का तिळाचे लाडू बनवले जातात. जाणून घेऊयात, यामागील कारण
संक्रांतीला तीळाचे लाडू का बनवतात
पौराणिक कथेनुसार, एकदा सूर्य देव आपल्या मुलावर अर्थात शनिदेवावर कोपले. सूर्यदेवांना इतका राग अनावर झाला की, त्यांनी रागाच्या भरात आपल्या शक्तीने शनिदेवाचे घर जाळले. यानंतर शनिदेवांनी वडिलांची जेव्हा माफी मागितली तेव्हा सूर्यदेवाचा राग शांत झाला. या घटनेनंतर भगवान सूर्यदेवाने शनिदेवाला सांगितले की, मकर राशीत जेव्हा तु प्रवेश करशील तेव्हा घर धनाने भरून जाईल, सुखही तुझ्या दारी नांदेल. अशा पद्धतीने मकर राशीला शनिदेवाला दुसरे घर मिळाले. नवीन घरी सूर्यदेव जेव्हा शनिदेवाच्या घरी आले तेव्हा शनिदेवाने वडिलांची तीळ आणि गुळानी पूजा केली. यानंतर सूर्यदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले की, जो कोणी मकर राशीत मकर संक्रातीच्या दिवशी तिळ आणि गुळाने माझी पूजा करेल, त्याला शनिदेवाचा आर्शिवाद मिळेल आणि अशा पद्धतीने मकर संक्रातील तिळाचे लाडू बनवण्याची परंपरा सुरू झाली.
हेही पाहा –