Wednesday, January 1, 2025
HomeमानिनीReligiousTulsi Plant : घरात तुळशीचे रोप का लावावे?

Tulsi Plant : घरात तुळशीचे रोप का लावावे?

Subscribe

हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. शास्त्रात तुळशीचे रोप शुभ आणि पवित्र मानण्यात आले आहे. तुळशीची दररोज पूजा करण्यात येते याशिवाय प्रत्येक धार्मिक कार्यात तुळशीच्या पानांचा वापर करण्यात येतो. भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे. त्यामुळे असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो.

या कारणांसाठी तुळशीचे रोप घरात ठेवावे – 

  • घरात तुळशीचे रोप लावल्याने घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जेचा वावर वाढतो.
  • तुळशीच्या रोपामुळे घरातील हवा शुद्ध होते आणि खेळती राहते.
  • शास्त्रात असे सांगण्यात आले आहे की, तुळशीचे रोप घरात लावल्याने लक्ष्मी देवीची कृपा घरातील मंडळी राहते.
  • दररोज तुळशीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.
  • तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते.
  • तुळशीचे रोप सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.
  • घरात तुळशीचे रोप असल्यावर आर्थिक अडचणी कमी होतात आणि प्रगतीचे मार्ग खूले होतात.
  • वास्तूदोष दूर करण्यासाठी तुळशीचे रोप घरात आवर्जून लावावे.
  • कुटूंबात सदस्यांमध्ये वादविवाद होत असतील तर तुळशीचे रोप घरात लावावे.
  • वास्तूशास्त्रानुसार, तुळशीचे रोप पूर्व दिशेला, उत्तर-पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते.
  • चुकूनही तुळस दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू नये.
  • तुळशीच्या रोपाला सुर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी.
  • तुळशीच रोप घरी आणण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार शुभ वार समजले जातात.
  • गुरुवार आणि शुक्रवारी तुळशीचे रोप घरी आणल्याने आर्थिक चणचणी दूर होतात, असे म्हटले आहे.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini