Wednesday, April 24, 2024
घरमानिनीदेशाच्या राजकारणातील मानिनी

देशाच्या राजकारणातील मानिनी

Subscribe

चंदा मांडवकर

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी अनेक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली असली तरी राजकारण हे असं क्षेत्र आहे जिथे कायम पुरुषांचीच मक्तेदारी आहे.
पण भारतीय राजकारणात अशाही काही महिला रणरागिणी आहेत ज्यांनी राजकीय क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे.

- Advertisement -

mamta banerjee on parth chatterjee arrest dont support corruption in ssc scam

-ममता बॅनर्जी

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमलू काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जीं यांना दीदी असे संबोधिले जाते.
१९५५ मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या ममता बॅनर्जीं दोन वेळा रेल्वेमंत्री होत्या.
देशातील पहिल्या महिला रेल्वेमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

या व्यतिरिक्त विविध पदांवर राज्य मंत्री म्हणनूही त्या कार्यरत होत्या. २०११ मध्ये त्यांनी ३४ वर्ष सत्तेत असलेल्या डाव्या पक्षाला आव्हान देत
तणृमलू काँग्रेसची सत्ता स्थापन केली. २०१२ मध्ये प्रसिद्ध ‘टाइम’ मॅगझिन मध्ये ‘जगातील १००
प्रभावशाली’ व्यक्तींच्या यादीत ममता दीदींचा समावेश होता.

ममता बॅनर्जी या शालेय जीवनापासनू राजकरणाशी जोडल्या गेल्या होत्या. त्यांना ७० च्या दशकात राज्य महिला
काँग्रेसचे महासचिव बनवण्यात आले होते. त्यावेळी त्या महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. त्यांचे वडील स्वातंत्र्य
सेनानी होते. वडिलांच्या मृत्यूनंतर ममतादीदींवर घराची जबाबदारी होती. गरीबीशी संघंर्ष करत त्यांनी दूध
विक्रीचे कामही केले आणि आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला.

दक्षिण कोलकाता मधील जोगमाया देवी महाविद्यालयातून ममता बॅनर्जी यांनी इतिहासात डिग्री
संपादन केली. त्यानतंर कोलकात्ता युनिव्हर्सिटीतून त्यांनी इस्लामिक इतिहासात मास्टर डिग्री घेतली. श्री शित्रायतन
महाविद्यालयातनू त्यांनी बीएडची डिग्री आणि जोगेश चद्रं चौधरी लॉ महाविद्यालयातनू त्यांनी कायद्याचे शिक्षण
घेतले आहे.

ममता बॅनर्जी यांचा राजकरणातील खरा प्रवास १९७० मध्ये सुरू झाला होता. जेव्हा त्या काँग्रेस पक्षाच्या
कार्यकर्त्या झाल्या. १९७६ ते१९८० पर्यंत त्या महिला काँग्रेसच्या महासचिव होत्या, १९८४ मध्ये ममता यांनी
मार्क्सवादी कम्यनिुनिस्ट पार्टीचे वरिष्ठ नेते सोमनाथ चटर्जी यांचा पराभव केला. त्यांना देशातील सर्वाधिक तरुण खासदार बनण्याचा मान ही मिळाला.

ncp supriya sule

सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील राजकरणात सक्रिय असलेले व्यक्तीमत्व आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या
नेता आणि बारामतीच्या खासदार आहेत. वडील राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी राजकरणात पाऊल टाकले.
सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ मध्ये झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सेंट कोलबिंया शाळेतून
पूर्ण केले. त्यानंतर मुंबईतील जय हिंद कॉलेज मधून मायक्रोबायोलॉजी मधनू बीएससीची डिग्री घेतली आहे.
तसेच त्यांनी पत्रकारिताही केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी २००६ मध्ये राज्यसभेच्या सदस्याच्या रुपात राजकरणात पहीलं पाऊल टाकलं.
त्यानंतर २००९ मध्ये त्या बारामती येथनू खासदार झाल्या आणि २०१४ मध्ये लोकसभा निवडणूकीत त्यांनी
आरएसपीचे महादेव जगन्नाथ यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता.

२०१५ मध्ये महिला सशक्तिकरण समितीच्या सदस्याच्या रुपात त्यांना नियुक्त करण्यात आले होते.
त्याचसोबत त्यांना सलग सात वेळा ससंद रत्न ही मिळालेला आहे. या व्यतिरिक्त २०११ मध्ये
कन्या भ्रूण हत्येच्या विरोधात अभियान ही सुरू केले होते. त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला.

पकंजा मुंडे

पकंजा मुंडे आपल्या वडिलांचा भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा चालवत आहे.
पंकजा या परळीतील आमदार आहेत. पकंजा मुंडे यांनी विज्ञानातनू पदवी संपादन केली आहे. त्याचसोबत
एम बी ए चे शिक्षण घेतले आहे. परळी मतदारसघांतून आमदारच्या रुपात निवडून येण्यापूर्वी त्या एका स्वयंसेवी संस्थेत
महत्वाची भूमिका बजावली आहे. राजकारणाचं बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालं.

२००९ मध्ये परळी मतदारसघांतून त्या विधानसभेच्या आमदार झाल्या. पण २०१४ च्या लोकसभा
निवडणकूी दरम्यान, त्यांनी आपल्या वडीलांसाठी आक्रमक भूमिका घेत प्रचार केला. त्यांनी कॅबिनेट मंत्र्याच्या रुपात
शपथ घेतली होती. त्यांनी ग्रामीण विकास, महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या पदावर काम केले.
तसेच पकंजा यांनी कन्या भ्रूण हत्येच्या विरोधात जोरदार अभियानही चालवले होते. या व्यतिरि क्त
काही सामाजिक कार्यांमध्येही त्यांचा फार मोठा हातभार लागलेला आहे.

पंकजा मुंडे यांच्या ताफ्यावर २०१२ मध्ये हल्ला झाला होता. या हल्ल्यातून पंकजा सुखरुप बचावल्या. त्यानंतर असा प्रसंग कोणत्याही महिलेवर येऊ नये या उद्देशाने त्यांनी ‘अॅप रक्षा’ म्हणनू एक अॅपची सुरू केले होते.

किशोरी पेडणेकर

कोणताही राजकीय वारसा नसताना मुंबईच्या महापौर पदाची धुरा यशस्वी पणे सांभाळणाऱ्या किशोरी पेडणेकर यांच बालपण गेलं ते वरळी नाका
येथे . किशोरी ताईंचे वडील मिल कामगार होते आणि आई गृहिणी. चाळीच्या छोट्याशा घरात २० माणसांचा राबता असलेल्या कुटुंबात त्या वाढल्या. पण
कुटुंबाच्या विरोधात जाऊन किशोरी यांनी लग्न केल्याने माहेर नाराज होते. पण किशोरीताईंनी नंतर सगळ्यांना पुन्हा एकत्र आणलं. त्यांनी नर्सिंगचीही नोकरी केली. पण सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याने नंतर
त्यांनी राजकारणात प्रवेश केला. लहानपणापासनूच बाळासाहेबांना त्या ऐकत होत्या. . त्यामळु वयाच्या १२ व्या वर्षा पासनूच राजकरणाशी त्यांची ओळख झाली होती. याचदरमयान, त्यांची भेट ही मंदाकिनी चौहान नावाच्या एका महिला नेत्यांशी झाली होती. त्या गिरणी कामगारांच्या वतीने लढत होत्या. त्यांच्यासोबत राहून, त्यांचे भाषण ऐकून किशोरी पेडणेकर यांना
प्रोत्साहन मिळत होत.

वर्ष २००२ मध्ये नोकरी सोडल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याची कामाची धडाडी बघून त्यांना ना नगर सेविकेचे पद दिले
गेले. त्यानतंर त्यांचे राजकारणातील कार्य अधिकच वाढत गेले. पण त्यामुळे त्यांच्या सहकार्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यांनी किशोरी ताईंचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण किशोरी ताईंनी न खचता आपल्या मार्गावर चालत राहील्या.

२०१९-२०२२ पर्यंत त्यांनी मुंबईच्या महापौर पदाची कमान सांभाळली. शिवसेनेतील त्या पहिल्या महि ला आहेत ज्या उपनेत्या झाल्या आहेत. त्या तीन विधानसभेच्या उपनेत्या आहेत.

 

- Advertisment -

Manini