Prepare time: 10 min
Cook: 20 min
Ready in: 30 min
Ingredients
- बटाटा - पावकिलो
- बारीक चिरलेली कोथिंबीर - आवडीनुसार
- बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - 1 ते 2
- आले पेस्ट : 1 लहान चमचा
- कॉर्न फ्लोअर - 4 मोठे चमचे
- टोमॅटो सॉस - 2 चमचे
- सोया सॉस - 1 चमचा
- चिली सॉस - 1 चमचा
- व्हिनेगर - 1 चमचा
- चिली फ्लेक्स - आवडीनुसार
- मीठ - अर्धा चमचा
- साखर - अर्धा चमचा
Directions
- बटाटे धुवून , सोलून घ्या आणि त्याचे लांब तुकडे तयार करुन घ्या. कापलेले तुकडे कॉर्नफ्लोअर मध्ये चांगल्याप्रकारे घोळवून घ्या.
- हे घोळवलेले तुकडे कढईत मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
- आता एक तवा गरम करा, त्यात 2 टेबलस्पून तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर यात आले पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या.
- आता मंद गॅसवर चिली सॉस, टोमॅटो सॉस, सोया सॉस घालून मिक्स करून घ्या.
- 1 चमचा कॉर्नफ्लोअर 1/4 कप पाण्यामध्ये घाला. व त्याच्या गुठळ्या होऊ न देता ते चांगले मिक्स करून घ्या.
- आता हे मिश्रण तव्यावर टाकून सॉससोबत मिक्स करून घ्या. यात मीठ, साखर टाकून 1-2 मिनिटांकरता शिजवून घ्या.
- यामध्ये तयार केलेली बटाट्याची कापं टाकून परतून घ्या. वरुन चिली फ्लेक्स, व्हिनेगर , कोथिंबीर टाका.
- अशाप्रकारे चिली पोटॅटो तयार आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यात वरून तीळही टाकू शकता.
- Advertisement -
- Advertisement -