Prepare time: 20 min
Cook: 15-20 min
Ready in: 30 min
Ingredients
- मैदा - अर्धा कप
- पिठी साखर - अर्धा कप
- दूध - 5 ते 6 चमचे
- डेअरी मिल्क
- बेकिंग पावडर
- बटर
- कोको पावडर
Directions
- कप केकच्या मोल्डला बटर लावून घ्यावे.
- यानंतर गॅसवर प्रेशर कुकर तापायला ठेवा. त्यात अर्धी वाटी मीठ टाका किंवा वाळू देखील वापरू शकता.
- यावर आता स्टॅंड गरम करण्यास ठेवावा.
- कुकरची शिटी काढावी आणि कुकर 10 मिनिटांसाठी झाकून प्री हिटसाठी करुन घ्यावा.
- आता एका भांड्यात मैदा, कोको पावडर, पिठी साखर, बेकिंग पावडर गाळून घ्यावी.
- मिश्रणात आवश्यकतेनुसार दूध टाकून एकजीव करुन घ्यावे.
- यानंतर मिश्रण केक मोल्डमध्ये भरा. त्यात वितळवलेली कॅडबरी मिक्स करावी.
- तयार केक मोल्ड कुकरमध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी बेक करायला ठेवावेत.
- 10 ते 15 मिनिटांनंतर कुकरचे झाकण उघडून तयार चोको लाव्हा केक सर्व्ह करावेत.