Prepare time: 20 min
Cook: 10 min
Ready in: 30 min
Ingredients
- नूडल्स - 250 ग्रॅम
- तेल
- सैंधव मीठ
- लसणाच्या पाकळ्या - 10 ते 12
- चिली सॉस
- सोया सॉस
- लाल मिरचीची पेस्ट
- साखर
- व्हिनेगर
- कांद्याची पात
Directions
- सर्वात आधी एका पातेल्यात भांड्याच पाणी उकळण्यास ठेवा. पाण्यात थोडे सैंधव मीठ घाला.
- पाणी उकळण्यास सुरूवात झाल्यावर त्यात नूडल्स टाका.
- नूडल्स व्यवस्थित शिजल्यावर त्यातील पाणी वेगळे करुन घ्या.
- एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घाला.
- तेल गरम झाल्यावर लसणाच्या पाकळ्या परतवून घ्याव्यात
- लसूण परतल्यावर त्यात चिली सॉस, सोया सॉस, मिरचीची पेस्ट टाकावी.
- मिश्रणात साखर, व्हिनेगर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
- तयार मिश्रण 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यावी.
- आता तयार मिश्रणात नूडल्स मिक्स करून घ्यावेत.
- नूडल्स पॅनमध्ये पुन्हा 3 मिनिटे शिजवून घ्यावेत.
- सर्वात शेवटी नूडल्समध्ये कांद्याची पात भुरभूरावी.
- अशा पद्धतीने घरातच तुम्ही रेंस्टॉरंट स्टाइल चिली गार्लिक नूडल्स बनवू शकता.