Friday, September 29, 2023
घर मानिनी Health इंट्रोवर्ट असण्याचे आहेत अनेक फायदे, स्मरणशक्ती उत्तम आणि बरचं काही

इंट्रोवर्ट असण्याचे आहेत अनेक फायदे, स्मरणशक्ती उत्तम आणि बरचं काही

Subscribe

व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हटले जाते. कारण प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी असते. त्यांचे दिसणे, बोलणे, वागणे, चालणे परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीने हाताळणे. इतके वेगळे गुण प्रत्येकात असतात. पण असे असले तरी ज्या व्यक्ती अंतर्मुख राहणे पसंत करतात, कमी बोलतात किंवा मोजकंच बोलतात. ज्यांचा मित्र परिवारही एक दोन जणांचाच असतो अशा इंट्रोवर्ट व्यक्तींबाबत सगळ्यांचेच एकमत असते की अशा व्यक्तीं एकल स्वभावामुळे एकट्या पडतात. त्या कोणाजवळ जात नाहीत त्यामुळे त्यांनाही कोणी विचारत नाहीत. पण तुम्हांला वाचून गंमत वाटेल की वरवर जरी या व्यक्ती अंतर्मुख , जगाशी कमी संबंध ठेवणाऱ्या असल्या तरी त्या इतरांच्या तुलनेत विचाराने अधिक सक्षम आणि मजबूत असतात.

इंट्रोवर्ट व्यकती कमी बोलणारी असल्याने ते लाजाळू, आणि माणूसघाणे असल्याचे समजले जाते. मनोचिकित्सकांचीही यावर वेगवेगळी मत आहेत. एका संशोधनानुसार इंट्रोवर्ट व्यक्तींचा मेंदू एक्स्ट्रोवर्ट व्यकतींच्या मेंदूच्या तुलनेत डोपामाईनवर वेगळ्या पद्धतीने काम करतो. यामुळे या दोन प्रकारच्या व्यक्ती एकाच प्रसंगावर वेगवेगळ्या पद्धतीने रिअॅक्ट होतो. उदाहरणार्थ एखाद्या जोकवर इंट्रोवर्ट व्यक्ती फक्त स्मित हास्य करते तर त्याच जोकवर एक्स्ट्रोवर्ट व्यकती पोट धरुन हसू शकते. पण याचा अर्थ असा नाही की इंट्रोवर्ट व्यक्तीला जोक्सचा आनंदही घेता येत नाही.

- Advertisement -

तर जास्त बोलणे कधी कधी त्रासदायक ठरते. यामुळे इंट्रोवर्ट व्यक्ती सहसा कोणत्याही वादात पडत नाहीत. याउलट अति बडबडीमुळे एक्स्ट्रोवर्ट व्यकतीं बऱ्याचेवळा उगाच वाद ओढवून घेतात.

- Advertisement -

इंट्रोवर्ट व्यक्ती या स्थिर मनोवृत्तीचे असतात. यामुळे अशा व्यक्ती कुठल्याही प्रसंगाना खंबीरपणे हाताळतात.

याउलट एक्स्ट्रोवर्ट व्यक्ती गोंधळून जातात.

इंट्रोवर्ट व्यक्ती या उत्तम सिक्रेट बॉक्स मित्र असतात.

एक्स्ट्रोवर्ट व्यक्ती चंचल असल्याने त्यांच्याकडे गुपित टिकून राहत नाही.

एक्स्ट्रोवर्ट व्यक्तींच्या तुलनेत इंट्रोवर्ट व्यक्तींची स्मरणशक्ती तीव्र असते.

इंट्रोवर्ट व्यक्तींना स्वत:ची सोबत जास्त आवडते त्यामुळे वाईट संगतीत या व्यकती सहसा पडत नाहीत.

इंट्रोवर्ट व्यक्ती विचारपूर्वक निर्णय घेत असल्ायने ते उत्तम सल्लागार असतात.

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -

Manini