Monday, March 17, 2025
HomeमानिनीKitchen Tips : प्रेशर कुकरमध्ये शिजवू नयेत हे पदार्थ

Kitchen Tips : प्रेशर कुकरमध्ये शिजवू नयेत हे पदार्थ

Subscribe

महिलांचे किचनमधील काम कमी करणारे विविध प्रॉडक्ट मार्केटमध्ये मिळतात. त्यापैंकी एक प्रेशर कुकर आहे. प्रेशर कुकरमध्ये कमी वेळात पदार्थ तयार होतो. ज्यामुळे महिलांचा वेळही वाचतो. त्यामुळे हल्ली कोणत्या महिलेच्या किचनमध्ये प्रेशर कुकर मिळणार नाही असे होणं अशक्यच आहे. पण, तुम्हाला हे माहित आहे का की, प्रेशर कुकरमध्ये काही पदार्थ शिजवणे हानिकारक ठरू शकते. कारण कुकरमध्ये हे पदार्थ शिजवल्यावर त्यातील पोषकतत्वे कमी होतात आणि असे पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे प्रेशर कुकरमध्ये कोणते पदार्थ शिजवू नयेत याची माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात, प्रेशर कुकरमध्ये कोणते पदार्थ शिजवू नये.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ –

प्रेशर कुकरमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ शिजवू नये. कारण उच्च तापमानामुळे दूध लवकर फाटते. दूध फाटल्यामुळे त्यातील पोषकतत्वे नष्ट होतात.

हिरव्या पालेभाज्या –

हिरव्या पालेभाज्या चुकूनही प्रेशर कुकरमध्ये शिजवू नयेत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्यांचा समावेश होतो. तुम्ही जर हिरव्या पालेभाज्या प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्यातील व्हिटॅमिन सी, ऍटी-ऑक्सिडंट नष्ट होतात आणि नाइट्रेट चे रूपांतर नाइट्राईटमध्ये होते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

पास्ता आणि नूडल्स –

पास्ता आणि नूडल्स प्रेशर कुकरमध्ये शिजवल्याने खूप जास्त नरम आणि चिकट होतात. त्यामुळे पास्ता आणि नूडल्ससारखे पदार्थ पॅनमध्ये शिजवावेत.

आंबट पदार्थ –

टोमॅटो, चिंच, दही, लिंबू सारखे आंबट पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवल्याने त्यातील ऍसिडिक गुणधर्म कुकरच्या धातुसोबत रिऍक्ट होतात. जे शरीरासाठी हानिकारक असते.

अंडी –

अंडी प्रेशर कुकरमध्ये उकडू नयेत. कारण अंडी उकडताना त्यातील प्रोटिन खूप जास्त प्रमाणात शिजते. अंड्यातील प्रोटिन जास्त प्रमाणात शिजल्याने त्यातील पोषक कमी होतात.

मासे –

मासे प्रेशर कुकरमध्ये शिजवू नये. प्रेशर कुकरमध्ये मासे खूप जास्त शिजतात आणि त्याचा पोत खराब होतो.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini