वास्तूशास्त्र आणि फेंगशुईनुसार घरात कासव ठेवणे शुभ असते. घरात धातू, काच किंवा क्रीस्टलचा कासव ठेवल्याने घरात सुख-शांती नांदते, असे वास्तूशास्त्र सांगते. कासव हे शांततेचे आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. घरात योग्य दिशेला कासव ठेवल्यावर सकारात्मक परिणाम दिसतात. याशिवाय घरात लक्ष्मी देवीचा वास राहतो आणि वास्तूदोष दूर होतो. त्यामुळे शास्त्रानुसार, घरात कोणता आणि कुठे ठेवावा, हे जाणून घेऊयात.
शास्त्रात कासवाचे महत्त्व –
पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूने आपल्या कच्छप अवतारात मंदराचल पर्वत पाठीवर घेतला होता. तेव्हापासून कासव समतोल, आधार आणि स्थिरतेचे प्रतीक मानले जाते.
घरात कासव ठेवण्याचे फायदे –
- कासव घरात ठेवल्याने कुटूंबातील व्यक्ती दिर्घायुषी होतात.
- कासव योग्य दिशेला ठेवल्यावर आर्थिक प्रगती होते. पैशांची चणचण कमी होते.
- कासव घरात ठेवल्याने घरातील वातावरण शांततेचे आणि आनंदीमय होते.
- कासव तुम्ही ऑफीसच्या डेस्कवर सुद्धा ठेवू शकता. या उपायाने नोकरीत प्रगती होते.
- कुटूंबाला वाईट नजरेपासून दूर ठेवायचे असेल तर घरात कासव ठेवावा.
- घराच्या मुख्य दारात पश्चिम दिशेकडे कासव ठेवल्याने सुरक्षा मिळते.
- घरातील लिव्हिंग रुममध्ये कासव ठेवल्याने कुटूंबातील प्रेम आणखीनच वाढते.
कोणते कासव कुठे ठेवाल –
धातुचे कासव –
धातूच्या कासवाची मूर्ती उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवणे शुभ असते. तुम्ही ही मूर्ती मुलांच्या खोलीत उत्तर-पश्चिमेला ठेवल्यास मुलांचा बौद्धिक विकास होतो.
लाकडाचे कासव –
शास्त्रानुसार, लाकडाचे कासव घराच्या पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वावर वाढतो.
मादी कासव –
मादी कासव घरात ठेवल्याने घरात होणारे कलह-वादविवाद कमी होतात.
काचेचं कासव –
घरात काचेचं कासव ठेवल्याने पैश्यासंबंधी सर्व समस्या दूर होतात आणि वास्तूदोष निर्माण होत नाही.
हेही पाहा –