Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min
Ingredients
- जांभूळ - 1 वाटी
- दही - 2 वाटी
- गूळ पावडर - पाव वाटी
- वेलची पावडर - अर्धा टीस्पून
- चिरलेले ड्रायफ्रूटस - आवडीनुसार
Directions
- जांभूळ श्रीखंड बनवण्यासाठी दही एका मलमलच्या कपड्यात गुंडाळा आणि त्याला 6 ते 7 तासांकरता फ्रीजमध्ये लटकवून ठेवा.
- दह्यातील पाणी पूर्णपणे निघून जायला हवं आणि दही घट्ट व्हायला हवं.
- आता जांभळं धुवून त्यातीस बिया काढून घ्या आणि त्यात गूळ पावडर टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्या.
- दह्यामध्ये वेलची पावडर टाकून त्याला क्रिमी टेक्स्चर येईपर्यंत रवीने किंवा चमच्याने फेटून घ्या.
- आता यात गूळ पावडर मिसळलेली जांभळाची पेस्ट टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.
- जांभळाचे श्रीखंड तयार आहे. याला सर्व्हिंग बाउलमध्ये काढून त्यात बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स टाका.
- आणि थोड्या वेळाकरता फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या. थंड झाल्यानंतर त्याचा आस्वाद घ्या.