Prepare time: 10 min
Cook: 20 min
Ready in: 30 min
Ingredients
- ज्वारीचे पीठ - 1 वाटी
- गव्हाचे पीठ - 2 चमचे
- मीठ - आवडीनुसार
- चिरलेला कांदा - 1
- चिरलेले टोमॅटो - 2
- पनीरचे तुकडे - 100 ग्रॅम
- काळी मिरी पावडर - 1 चमचा
- मिक्स हर्ब्स - 1 चमचा
- मक्याचे दाणे- अर्धा कप
- हिरव्या मिरच्या - 2
- मेयोनीज - आवडीनुसार
- तूप - आवश्यकतेनुसार
Directions
- सर्वात आधी ज्वारीच्या पिठात गव्हाचे पीठ टाकून त्यात मीठ, काळी मिरी, तूप टाका.
- आता कोमट पाण्याने याची कणीक मळून घ्या. व एका बाजूला झाकून ठेवून द्या.
- तव्यावर तेल टाकून त्यात कांदा, टोमॅटो, मक्याचे दाणे, पनीरचे तुकडे , मिक्स हर्ब्स, काळी मिरी, चिलीफ्लेक्स टाकून परतून घ्या.
- आता तयार पिठाचे गोळे तयार करुन त्यांच्या पोळ्या लाटून घ्या. तव्यावर एका बाजूने तूप किंवा तेल लावून पोळी शेकवून घ्या.
- पोळी पलटून पलटलेल्या बाजूला मेयोनीज लावून घ्या. आता त्यावर पनीरचे तयार मिश्रण टाका व पोळी मिश्रणावर अर्ध्या बाजूने पलटा.
- अशाप्रकारे स्वादिष्ट ज्वारी- पनीरचे टाकोज् तयार आहेत.
- Advertisement -
- Advertisement -