Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min
Ingredients
- मेथी - 1 जुडी
- पनीरचे तुकडे - 2 वाट्या
- चिरलेला कांदा - 1 वाटी
- काजू - 10-12
- हिरव्या मिरच्या - 2
- आले कुटलेले - 2 चमचे
- चिरलेले लसूण - 1 चमचा
- बारीक चिरलेली हिरवी मिरची - 1
- हळद - आवश्यकतेनुसार
- लाल तिखट - 1 चमचा
- धणेजिरे पूड - 1 चमचा
- दही - अर्धा कप
- फ्रेश क्रीम - 2 चमचे
- बडीशेप पावडर - 1 चमचा
- मीठ आणि काळी मिरी पावडर - आवडीनुसार
Directions
- मेथीचे देठ तोडून त्याची पाने 10 मिनिटांकरता मिठाच्या पाण्यात घालून ठेवा.
- कांदा, काजू आणि हिरव्या मिरच्या यांना 10 मिनिटांकरता शिजवा आणि थोडं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- दही, फ्रेश क्रीम, बडीशेप पावडर यांना एकत्र करून त्यांची पेस्ट बनवून घ्या.
- तव्यावर तेल गरम करत ठेवा आणि त्यात पनीरचे तुकडे तळून घ्या. व एका डिशमध्ये काढून घ्या.
- आता तव्यावर आले, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून परतून घ्या.
- मेथीची पाने, हळद, लालतिखट आणि धणेजिरे पूड टाकून मिक्स करून घ्या.
- आता यात काजूची पेस्ट, पनीर आणि थोडेसे पाणी टाकून मिक्स करून घ्या. व 5 मिनिटे शिजवत ठेवा.
- गरमागरम मेथी चमन तयार आहे. तुम्ही हे पोळी, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता.