Sunday, February 16, 2025
HomeमानिनीReligiousVastu Tips : या वस्तू घरात ठेवल्याने पॉझिटिव्हिटी वाढेल

Vastu Tips : या वस्तू घरात ठेवल्याने पॉझिटिव्हिटी वाढेल

Subscribe

घरात सकारात्मक ऊर्जा असणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे घरात सुख शांती चे वातावरण निर्माण होते. वास्तुशास्त्रप्रमाणे घरात काही विशिष्ट वस्तू ठेवल्याने पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि घरातील वाद देखील दूर होतात. त्यामुळे घरातील वस्तू देखील महत्वाचा भाग आहे. आज आपण जाणून घेऊयात घरात कोणत्या वस्तू ठेवल्याने पॉझिटिव्हिटी वाढते.

तुळशीचे रोप

तुळशीचे रोप हे अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. तुळशीच्या रोपाची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी, आरोग्य आणि शांती येते, असे मानले जाते.

फुलं

घरात फुल ठेवल्याने पॉझिटिव्हिटी वाढते. ताज्या फुलांचा गंध आणि रंग वातावरणात आनंद आणतो.

हास्याचे फोटो किंवा चित्रे

आनंदी आणि स्मितहास्य करणारी चित्रे मनावर सकारात्मक परिणाम करतात.

लाफिंग बुद्ध

लाफिंग बुद्धाला वास्तुशास्त्रात विशेष महत्व आहे. लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने पॉझिटिव्हिटी वाढते आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी निर्माण होते. योग्य दिशा आणि वास्तूनुसार जर लाफिंग बुद्ध घरात ठेवला तर घरामध्ये पैशाशी संबंधित समस्या कधीच येत नाहीत. बरेच लोक त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी आणि कार्यालयांमध्ये लाफिंग बुद्ध ठेवतात.

अरोमा कॅन्डल्स

सुगंधी मेणबत्त्या घरात आराम आणि शांती आणण्यास मदत करतात. हे मूड सुधारतात आणि ताण कमी करतात. या मेणबत्त्यांमध्ये असलेल्या तेलांमुळे ते आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात. लव्हेंडर, चंदन किंवा लिंबाचा सुवास मनाला शांत करते.

देवांचे फोटो किंवा मूर्ती

आपल्या प्रत्येकाच्या घरात देवांचे फोटो किंवा मूर्ती असतात. या फोटो किंवा मूर्तीमुळे घरात प्रसन्न आणि शांत वातावरण निर्माण होते तसेच खूप पॉझिटिव्हि देखील वाढते.

घड्याळ

घड्याळ नेहमी घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर भिंतीवर लावावेत. भिंतीचे घड्याळ या दिशेला ठेवल्यास नवीन संधी मिळण्यास मदत होते आणि कोणत्याही अडचणीशिवाय काम करण्यास मदत होते. घरात हिरव्या रंगाची घड्याळे लावणे टाळा.

हेही वाचा : Vastu Tips For Kitchen : किचनमध्ये देवघर असावे का?


Edited By : Prachi Manjrekar

Manini