Prepare time: 20 min
Cook: 15-20 min
Ready in: 30 min
Ingredients
- बेसन - 1/2 कप
- दही - 1/2 कप
- किसलेलं खोबरे - 2 ते 3 चमचे
- आलं लसूण पेस्ट
- तीळ - 1 चमचा
- हळद
- मीठ
- मोहरी
- हिरवी मिरची -1
- चिरलेली कोथिंबीर
Directions
- एका भांड्यात बेसन, दही, आले-लसूण पेस्ट, हळदीची गुठळ्या न होता फेटून घ्यावे.
- यानंतर मिश्रणात चवीपुरतं मीठ टाकावे.
- आता भांडे गॅसवर ठेवा आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवावी.
- मिश्रण सतत ढवळत राहावे आणि घट्ट होईपर्यत शिजवावे.
- शिजलेले मिश्रण मोठ्या ताटात थंड होण्यासाठी पसरवून घ्यावे.
- मिश्रण थंड झाले की, सुरीने लांबट आकाराच्या पट्या कापून घ्याव्यात.
- या पट्यांचे हलक्या हातांनी रोल करून घ्यावेत.
- यानंतर एका पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करावे. त्यात फोडणीसाठी मोहरी, कडीपत्ता, हिरवी मिरची घालावी.
- तयार फोडणी खांडवीच्या रोलवर टाकावी. फोडणीवर किसलेलं खोबरं , चिरलेली कोथिंबीर टाकावी.
- तुमची खांडवी तयार झाली आहे.