Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- 2 किलो ताजे खेकडे
- 2 कांदे
- 2 टोमॅटो
- 1/2 वाटी किसलेला नारळ
- 2-3 हिरव्या मिरच्या
- 2 चमचे आलं-लसूण पेस्ट
- 1 चमचा लाल तिखट
- 1/2 चमचा हळद
- 1 चमचा गरम मसाला
- 1 चमचा कोथिंबीर
- 2 चमचे तेल
- चवीनुसार मीठ
- पाणी
Directions
- एका पॅनमध्ये एक चमचा तेल घालून पॅन गरम करून घ्या.
- एक कांदा, खोबर ,हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट घालून मिश्रण गुलाबी होई पर्यत भाजून घ्या.
- हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
- मिक्सरमध्ये बारीक वाटून झाल्यावर बाजूला ठेवून द्या.
- खेकडा मसाला तयार करण्याची पद्धत
- खेकडे स्वच्छ धुऊन घ्या.
- कढईत तेल गरम करून त्यात उरलेला कांदा घालून सोनेरी होऊ पर्यत परतून घ्या.
- कांदा सोनेरी होऊ पर्यत त्यामध्ये टोमॅटो घाला आणि मऊ होईपर्यंत शिजवा.
- तयार केलेला मसाला पेस्ट यामध्ये घालून 2-3 मिनिटे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या.
- मिक्स केल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, आणि मीठ घाला.
- खेकडे घालून चांगले मिक्स करून घ्या.
- आवश्यकतेनुसार पाणी घालून 10-12 मिनिटे मध्यम आचेवर झाकण ठेवून शिजवा. कोथिंबीर घालून आणि गरमागरम खेकडा मसाला तयार आहे. हा खेकडा मसाला तुम्ही भात किंवा भाकरीसोबत सर्व्ह करू शकता.