स्मूदी हा असा प्रकार आहे. जो तुम्ही कधीही खाऊ शकता. तसेच स्मूदी अनेक फळांपासून बनवता येते. जर का तुम्हाला फळे खायला आवडत नसतील तर तुम्ही स्मूदी अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनवू शकता. आरोग्याला पोषक असणारी स्मूदीला लागणार साहित्य आणि कृती जाणून घेऊया….
साहित्य
- 1 सफरचंद
- 1 कापलेले केळ
- 1 टीस्पून बदाम बटर
- 1 टीस्पून पांढरे चिया बियाणे
- 1 कप बदामाचे दूध
- 1/2 टीस्पून व्हॅनिला अर्क
कृती
- सर्वप्रथम सफरचंद आणि केळं स्वच्छ धुवून घ्या.
- आता सफरचंद आणि केळ्याचे काप करा.
- हे झाल्यावर ब्लेंडरमध्ये हे काप टाका.
- यानंतर बदामाचे दूध किंवा साधे दूध टाका.
- यावर आता बदाम बटर,चिया बियाणे,व्हॅनिला अर्क टाका.
- हे सगळं टाकून झाल्यावर आता यात बर्फ टाका.
- शेवटी हे सगळे छान बारीक ब्लेंडर मध्ये मिक्सर करून घ्या.
- तयार आहे तुमची थंडगार अॅपल बदाम व्हॅनिला स्मूदी.
हेही वाचा : Black Coffee : घरी बनवा ब्लॅक हॉट कॉफी
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -