Tuesday, February 20, 2024
घरमानिनीKitchenभाज्या आणि फळं धुताना अशी काळजी घ्या....

भाज्या आणि फळं धुताना अशी काळजी घ्या….

Subscribe

ठराविक भाज्या आहेत ज्या तुम्ही चांगल्या धुतल्याच पाहिजे कारण त्या एकदा स्वच्छ करून लगेच साफ होत नाहीत.

भाज्या आणि फळे हे रोजच्या रोज घरी आणल्या जाणाऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. भाज्या आणि फळांमध्ये असलेली कीड माती आपल्या शरीरासाठी अतिशय हानिकारक असते,त्यामुळे जेव्हा बाजारातून फळे भाज्या आणल्या नंतर त्या नीट स्वच्छ धुवून घेणे खूप गरजेचे आहे. ठराविक भाज्या आहेत ज्या तुम्ही चांगल्या धुतल्याच पाहिजे कारण त्या एकदा स्वच्छ करून लगेच साफ होत नाहीत. तसेच पालेभाज्या धुताना त्या दोनदा पाण्यातून काढून घ्याव्यात. त्यामुळे त्या स्वच्छ आणि चांगल्या राहतात. तसेच फळांवरती अनेक प्रकारचे स्प्रे केले जातात. कीटकनाशकांची फवारणी त्यावर केली जाते. त्यामुळे फळे खाताना ही काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आता आपण भाज्या आणि फळं बाजारातून विकत आणल्यावर कशाप्रकारे स्वच्छ करू शकता. हे पाहणारा आहोत…

How To Sanitise Vegetables, Milk Packets, Deliveries and More

 • भाजी अथवा फळ कापण्यापूर्वी कमीत कमी १० मिनीटे आधी तुमचे हात हॅंडवॉशने स्वच्छ करा.
 • तुमच्या किचनमधील इतर साहित्य जसे की, चाकू, विळी, कटिंग बोर्ड स्वच्छ धुवून घ्या.
 • शक्य असल्यास या वस्तू गरम पाण्याने धुवा ज्यामुळे त्या निर्जंतूक होतील.
 • भाज्या आणि फळे नळाखाली वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या.
 • भाज्यांवरील माती आणि धुळ स्वच्छ झाल्यावर ती काही मिनीटांसाठी खाण्याचा सोडा, व्हिनेगर अथवा मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. ज्यामुळे भाजी आणि फळे निर्जंतूक होतील.
 • भाज्या आणि फळे मीठ अथवा सोड्याच्या पाण्यातून बाहेर काढा आणि घरातील स्वच्छ कापडाने पुसून घ्या.
 • त्यानंतर पाण्याने धुतलेल्या चाकू, विळी अथवा चॉपिंग बोर्डवर ती कापण्यास घ्या.
 • भाज्या अथवा फळे बराच वेळ कापून ठेवू नका.
 • कापल्यानंतर भाजी स्वयंपाकासाठी आणि फळे खाण्यासाठी वापरा. कारण कापून ठेवलेल्या भाजी आणि फळांवर जीवजंतूंचे पोषण लवकर होऊ शकते.
 • कोबी अथवा लॅट्यूसवर असलेली वरच्या आवरणांची पाने काढून टाकून द्या.
 • त्या पानांचा वापर करणे शक्य असल्यास टाळा. कारण त्यावर माती जास्त असते. आणि त्यावरचे आवरण खराब सुद्धा असते.
 • बाजारात सोलून, कापून आणि रेडी टू कूक पद्धतीने मिळणाऱ्या भाज्यांचा वापर करणे टाळा.
 • भाज्या अथवा फळांना धुवून आणि कापून झाल्यावर पुन्हा तुमचे हात गरम पाण्याने स्वच्छ धुवा. किंवा हँडवॉशचा वापर करा.
 • ज्या भाज्या नंतर वापरायच्या असतील त्या धुवून आणि पुसून चांगल्या हवाबंद डब्यात भरून ठेवा.

हेही वाचा : रुचकर जेवणासाठी वापरा ‘या’ टिप्स

- Advertisment -

Manini