Thursday, February 22, 2024
घरमानिनीKitchenकेक बनवताना बेकिंगच्या या '५' टिप्स जरूर फॉलो करा

केक बनवताना बेकिंगच्या या ‘५’ टिप्स जरूर फॉलो करा

Subscribe

ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये केक हा महत्वाचा भाग असतो. केकशिवाय हा सण पूर्ण होऊच शकत नाही. बर्‍याचदा केक बाजारातून आणला जातो आणि फ्रिज मध्ये ठेऊन नंतर सेलिब्रेशनसाठी वापरण्यात येतो. मात्र, ख्रिसमसला सुट्टी असल्याने बऱ्याच घरात केक घरी देखील बनविला जातो . आज आम्ही तुम्हाला अश्या काही टिप्स देणार आहोत ज्याने तुमचा केक आणखी चविष्ट बनेल.

How to Bake Nigerian Cake: 12 Steps (with Pictures) - wikiHow

सामग्री योग्य प्रमाणात घ्या –

सर्वात महत्वाचे म्हणजे बेकिंग करताना सर्व सामग्री योग्य प्रमाणात घेतली पाहिजे . यासाठी तुम्ही वजन मोजण्यासाठी डिजिटल स्केलचा वापर करू शकता. तुमच्याकडे डिजिटल स्केल नसेल तर तुम्ही चमच्याचे माप सुद्धा घेऊ शकता .

Room temperatureवर इंग्रीडिएंट्स ठेवा –

केक बनविताना रेसिपीनुसार रूम टेम्परेचरची आवश्यकता असेल तर त्याकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे . बेकिंगमध्ये हा महत्वाचा टप्पा असतो कारण काही गोष्टी मलईदार आणि फ्लफी बनविल्या जातात. लोणी, दूध, अंडी आधी पदार्थ फ्रिजमधून बाहेर काढून लगेचच वापरल्यास ते नीट फेटले जात नाही .त्यासाठी गोष्टी फ्रिजमधून 30 ते 40 मिनिटे आधीच बाहेर काढा आणि नंतर बेकिंगमध्ये वापरा.

Page 74 | Oven Cake Images - Free Download on Freepik

- Advertisement -

जास्त मिसळणे टाळा –

बेकिंग करताना जास्त मिसळणे टाळा, अन्यथा तुमचे डेझर्ट खराब होऊ शकते. याचे कारण असे की एकदा आपण रेसिपीमध्ये पीठ घातल्यास, मिश्रण ग्लूटेनला उत्तेजित करते, म्हणून ते मळले जाते.

ओव्हन प्रीहीट करायला विसरू नका –

बेकिंग करण्यापूर्वी ओव्हन गरम करा आणि वेळोवेळी तापमानावर लक्ष ठेवा. याशिवाय, हे लक्षात ठेवा की चीज शिजेपर्यंत ओव्हन उघडू नका, यामुळे स्वयंपाक होण्यास वेळ लागू शकतो.

पॅन योग्यरित्या तयार करा –

सर्वात पहिले आपल्याकडे असलेला बेकिंग पॅन केकसाठी योग्य आहे का याची खात्री करा. तसेच केक बेक करण्यासाठी पार्चमेंट पेपरचा वापर अवश्य करा.जेव्हा तुम्ही बेकिंगसाठी शीट, ट्रे किंवा पॅन वापरता तेव्हा ते चांगले ग्रीस करून घ्या

 


हेही वाचा ; Broccoli Soup : हेल्दी ब्रोकली सूप

- Advertisment -

Manini