सणासुदीला किंवा नाश्तासाठी आपण चकली, शेव खातो. मात्र चकली किंवा शेव बनवण्यासाठीचे भांडे असेल तर ते पदार्थ व्यवस्थितीत होतात. अशातच बहुतांश महिलांना चकली, शेवचे भांडे नक्की कसे स्वच्छ करायचे हे कळत नाही. त्यामुळे त्यामध्ये अडकलेले तसेच चिकटून राहते आणि काढणे सुद्धा मुश्किल होते. चकली, शेवचे भांडे स्वच्छ कसे करायचे याच संदर्भातील काही टीप्स आपण पाहणार आहोत.
चकलीची मशीन अशी करा स्वच्छ
चकलीची मशीन स्वच्छ करायची असेल तर एका बादलीत पाणी घेऊन त्यात ते भांडे एक तास तरी भिजवून ठेवा. त्यानंतर तुम्ही स्क्रबरच्या माध्यमातून स्वच्छ करुन घ्या. पिण्यात भांडे भिजत ठेवल्याने त्याला चिकटलेले पीठ निघून जाईल आणि व्यवस्थितीत धुतले जाईल.
शेवचे भांडे असे करा स्वच्छ
शेवच्या भांड्याला काही वेळेस चण्याचे पीठ चिकटून राहते किंवा तेल लागते. त्यामुळे ते भांडे स्वच्छ करणे थोडे मुश्लिक होते. शेवच्या भांड्याचा साचा थोडा वेगळा असतो. त्यामुळे ते स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी, लिंबूचा रस, बेकिंग सोडा, सर्फ आणि व्हिनेगर मिक्स करुन त्यात ते बुडवून ठेवा. असे केल्याने भांडे भिजले जाईल आणि साधारण स्क्रबरच्या माध्यमातून नंतर स्वच्छ धुवू शकता.
हेही वाचा- भांड्यांचा स्क्रब एक पण, उपयोग अनेक…