आपण अनेकवेळा नारळ विकत घेतो पण आपल्याला समजत नाही पाण्याने भरलेला नारळ कोणता ? आणि मलाईने भरलेला नारळ कोणता.? नारळाचे पाणी हे अतिशय उपयोगी मानले जाते. तसेच उन्हाळयात नारळाच्या पाण्याला विशेष असे महत्त्व आहे. नारळाच्या पाण्यात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. तसेच नारळ पाणी किंवा नारळाची मलाई खाल्यामुळे शरीरावर कमालीचे परिणाम दिसून येतात.
- Advertisement -
असे ओळखा नारळात पाणी आहे कि मलई आहे-
- सर्वप्रथम नारळ जितका मोठा असेल तितके पाणी जास्त असेल असा विचार करू नका.
- कारण मोठे झाल्यावर पिकण्याची शक्यता जास्त असते.
- यामुळे त्यात मलाई बनण्याची शक्यताही वाढते आणि जेव्हा नारळात मलाई बनते, तेव्हा आपोआप त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
- कारण मलाई पाण्यापासून तयार होते.
- त्यामुळे सरासरी आकाराचे नारळ निवडा.
- नारळ कानाजवळ घेऊन हलवा. त्यात पाण्याचा खळखळ आवाज येत असेल तर घेऊ नका.
- कारण जेव्हा नारळातून पाण्याचा खळखळ आवाज येतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्यात मलाई तयार होऊ लागली आहे.
- त्यामुळे ज्या नारळातून पाण्याचा आवाज येत नसेल तो नारळ घ्या. कारण हे नारळ पूर्णपणे पाण्याने भरलेले असतात.
- नारळ निवडताना त्याच्या रंगाची विशेष काळजी घ्या.
- तसेच नारळ हिरवे आणि ताजे असावे.
- ते जितके जास्त हिरवे असेल तितके जास्त पाणी असण्याची शक्यता असते.
- नारळावर तपकिरी रंगाचे ठिपके नसावेत.
- जास्त पाणी हवे असल्यास तपकिरी, पिवळा-हिरवा आणि हिरवा-तपकिरी रंगाचा नारळ निवडू नये.
- Advertisement -
हेही वाचा : Workout Tips : वर्कआऊट करताना गरगरत, चक्कर येतेय?.. मग वाचा