लसूण आणि कांद्याशिवाय तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने कोथिंबीर आणि आवळा चटणी घरी करू शकता. ही चटणी तुम्ही भातासोबत आणि भाकरी सोबत अगदी सहजपणे खाऊ शकता. तसेच या चटणीमुळे शरीराला थंडावा मिळतो. झटपट होणारी ही चटणी कशी बनवायची जाणून घेऊया…
- Advertisement -
साहित्य
- अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
- मिरची 2-3
- चवीनुसार रॉक मीठ
- दोन ते तीन चिरलेला आवळा
- कढीपत्ता 2-3
- 1 टेबलस्पून मोहरी
कृती
- Advertisement -
- कोथिंबीर बारीक चिरून मिक्सरमध्ये टाका.
- यानंतर त्यात मीठ, मिरची आणि आवळा बारीक चिरून मिक्सरमध्ये घाला.
- 2-3 चमचे त्यात पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्या.
- या चटणीला कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी देखील देऊ शकता.
________________________________________________________________________
हेही वाचा : Amla Chutney : घरी बनवा झटपट आरोग्यदायी आवळ्याची चटणी