आपण सगळेजण फळे तर खातोच पण फळे खाताना एक चवदार चव आपल्याला हवी असते. तर आपण या फळांवर मसाले किंवा काळ मीठ टाकून खातो. तसेच बरेच लोक असे आहेत जे फळांची कोशिंबीर बनवण्यासाठी चिरलेल्या फळांवर चाट मसाला टाकतात. किंवा मग फळांचा गोडवा वाढवण्यासाठी फळांमध्ये अतिरिक्त साखरेचाही वापर केला जातो. तसेच फळे नियमित खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक तत्व मिळतात.

मिठ किंवा मसाला टाकून फळे खाल्यास ‘हे’ परिणाम शरीरावर होतात-
- फळांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. यामध्ये ग्लुकोजचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे कॅलरी वाढते.
- अशा वेळी कापलेल्या फळांवर साखर घातल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते.
- यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
- मिठामध्ये आणि मसाल्यामध्ये सोडियम आढळते.
- या सोडियममुळे आपल्या शरीरातील पाणी तर वाढतेच पण किडनीवरही वाईट परिणाम होतो.

- त्यामुळे जर तुम्हाला किडनीच्या आजाराने ग्रासले असेल तर तुम्ही मीठ किंवा मसाल्याशिवाय फळे खावीत.
- फळांना पोषक तत्वांचे पॉवर हाऊस म्हटले जाते.
- पण कापलेल्या फळांवर मीठ किंवा कोणताही मसाला टाकताच फळांमधील आवश्यक पोषक तत्वे नष्ट होतात.
- यामुळे फळे निरोगी राहत नाहीत.
- तसेच मीठाशिवाय फळे खाल्ल्याने फळांमधून पाणी कमी होत नाही.
- त्यामुळे फळांमध्ये तेवढेच पोषक तत्व टिकून राहतात. जे आपल्या शरीराला फायदेशीर आहे.
हेही वाचा : ‘या’ पदार्थांचे करा सेवन,चाळिशीतही दिसाल तरुण
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -