Sunday, February 25, 2024
घरमानिनीKitchenतुम्ही चहासाठी प्लॅस्टिकची गाळणी वापरता का?

तुम्ही चहासाठी प्लॅस्टिकची गाळणी वापरता का?

Subscribe

तुम्ही चहाचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच खास आहे. तुम्ही चहासोबत ‘विष’ तर नाही पित ना? कारण हे आहे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक. आता आपण हल्ली सगळीकडेच बघतो की प्लॅस्टिकची गाळणी ही सर्रास वापरली जाते. तसेच घरा-घरा मध्ये आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या स्टॉल्समध्ये प्लॅस्टिकीची गाळणी बिनधास्तपणे वापरली जाते. आपल्यापैकी बरेचजण याची काळजी घेत नाहीत आणि कोणताही विचार न करता चहाचा आनंद घेतात. पण जर तुम्ही नेहमीप्रमाणे आता सुद्धा प्लॅस्टिकच्या गाळणीतून चहा पायात असाल तर वेळीच सावधान व्हा. प्लास्टिकची गाळण म्हणजे रोगांचे घर आहे जे तुमच्यासाठी घातक ठरू शकते.

The chai walas of India | Poverty and Development | Al Jazeera

- Advertisement -

कधीकधी चहाचे गाळणे हे रिसायकल केलेल्या प्लास्टिकपासून बनवले जाते. अशातच चहा जेव्हा ओतला जातो तेव्हा तो चहा गाळून येत असतो. यामुळे त्यातील विषारी रसायने कप आणि चहाच्या केटलमध्ये जातात. ज्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.

प्लास्टिकच्या गाळणीतून चहा गाळण्याचे तोटे पुढीलप्रमाणे

- Advertisement -

1. कॅन्सरचा धोका

प्लास्टिकमध्ये मेट्रोसमिन आणि बिस्फेनॉल सारखी हानिकारक रसायने आढळतात. जी आपल्या शरीरात कॅन्सर पसरवण्याचे काम करतात. हा एक धोकादायक आजार असून यामुळे माणसाचा जीव जाऊ शकतो.

2. गरोदर महिलांना होतो याचा त्रास

गरोदर महिलांनी प्लॅस्टिक स्ट्रेनरचा चहा चुकूनही पिऊ नये कारण ते मायक्रोप्लास्टिक्स न जन्मलेल्या बाळालाही संक्रमित करू शकतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

3. किडनीवर परिणाम

अनेक संशोधनांमध्ये असं सिद्ध झाले आहे की, प्लास्टिकच्या संपर्कात आलेली पेये पिल्याने किडनी खराब होते. कारण या प्लास्टिकचा सेवनामुळे मूत्रपिंडाच्या फिल्टरिंग प्रक्रियेवर परिणाम होतो.

4. पुरुषांमध्ये नपुंसकत्व

जर पुरुषांना प्लॅस्टिक चहा गाळण्याची सवय असेल तर ती ताबडतोब बदला, कारण त्यामुळे नपुंसकत्व येऊ शकते. तसेच यामध्ये असलेले केमिकल्स पुरुषांच्या लैगिक आयुष्यावर परिणाम करू शकतात.

5. अपचन

चहाच्या गाळणीतून बाहेर पडणारे मायक्रोप्लास्टिक्स आपल्या आतड्यांचे आरोग्य बिघडवतात. ज्यामुळे आपली पचनक्रिया बिघडू शकते. काही खाल्यावर ते पचत नाही. तसेच ऍसिडिटीची समस्या वाढते.

6. मेंदूवर परिणाम

प्लास्टिकमध्ये असलेल्या धोकादायक रसायनांचा आपल्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो.


हेही वाचा :  

फ्रिजमध्ये ठेवलेली भेंडी लगेच सुकते, मग या टीप्स येतील कामी

- Advertisment -

Manini