Monday, April 15, 2024
घरमानिनीKitchenRecipe : शेवग्याच्या शेंगाचे सूप

Recipe : शेवग्याच्या शेंगाचे सूप

Subscribe

आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचे सूप कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साहित्य : 

 • 6-7 शेवग्याच्या शेंगा
 • 1 मध्यम कांदा
 • 1 मध्यम बटाटा
 • 10-12 लसुण पाकळ्या
 • 1 इंच आले
 • 10 काळीमिरी
 • 1 टिस्पून साखर
 • 6 लवंगा
 • 2 टिस्पून जिरे
 • 1 टिस्पून बडिशोप
 • 1 टेबलस्पून तूप
 • 1 टिस्पून मिरपूड
 • चवीनुसार मिठ

कृती :

Drumstick soup Recipe by Subha Suresh - Cookpad

- Advertisement -
 • मध्यम आकाराच्या भरलेल्या कोवळ्या शेंगा घ्याव्यात. त्याचे तुकडे करावेत.कांदा जाडसर चिरावा, बटाट्याचे मध्यम आकाराचे फोडी करावेत, आल्याचे तुकडे, करावेत.
 • दुसरीकडे कुकरमध्ये साजुक तूप गरम झाल्यावर त्यात जिरे, बडिशोप, मिरी, लवंगा टाकून परतुन घ्यावी.
 • नंतर त्यात सर्व भाज्या परतून घ्याव्यात. पाणी टाकून ५-६ शिट्टया काढाव्यात.
 • भाज्या थंड करून पाणी व भाज्या वेगळ्या कराव्यात.
 • भाज्या थंड करून पाणी व भाज्या वेगळ्या काढून स्मॅश करा.
 • शेंगांचा गर व बिया वेगळ्या स्मॅश करून घ्या सर्व मिश्रणाची पेस्ट करा त्यात भाज्यांचे पाणी ओता.
 • पातेल्यात साजुक तुप गरम करुन घ्या.
 • जिरे टाकून फोडणी द्या.
 • त्यावर स्मॅश केलेली पेस्ट ओतून उकळी काढा.
 • मीठ, साखर आणि मिरपूड टाका .
 • शेवग्याच्या शेंगाचे सूप तयार

हेही वाचा :

Momos Recipe : चटपटीत व्हेज मोमोज

- Advertisment -

Manini