ड्राय फ्रुटस हे शरीराला चांगले असतात. जर का तुम्हाला ड्राय फ्रुटस असेच खायला आवडत नसतील तर तुम्ही त्याचे शेक देखील बनवून पिऊ शकता. तसेच हे ड्राय फ्रुटस शेक शरीरासाठी खूप उपयोगी आहे. घरच्या घरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे हेल्दी शेक बनवू शकता. जाणून घेऊया ड्राय फ्रुटस बनवण्यासाठी लागणारे साहित्य कृती…
साहित्य
- Advertisement -
- दूध – 1 ग्लास
- अक्रोड – 4 तुकडे
- बदाम – 5
- काजू – 4
- काळे मनुके – 5
- मखाने – मूठभर
- केळी – अर्धा
- भोपळा बिया – 1 टीस्पून
कृती
- सर्वप्रथम मिक्सर जारमध्ये दूध ओतून घ्या.
- हे झाल्यावर वर दिलेले इतर सर्व साहित्य घालून हे मिश्रण चांगले एकजीव करा.
- यानंतर यामध्ये भोपळ्याच्या बिया जर का आवडत असतील तर घाला.
- तुमचा हेल्दी शेक आता तयार आहे.
- हा शेक तुम्ही जेवण न जेवता देखील पिऊ शकता.
________________________________________________________________________