Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen उन्हाळ्यात कैरी भातासोबत बनवा सोपी कोशिंबीरची रेसीपी

उन्हाळ्यात कैरी भातासोबत बनवा सोपी कोशिंबीरची रेसीपी

Subscribe

उन्हाळ्यात (summer) प्रचंड उकाडा आणि अंगावर येणारा घाममुळे प्रचंड चिडचीड होते. यामुळे जेवण काय करायचे आणि उन्हाळ्यात जेवणाची इच्छा देखील होत नाही. अशा वेळी काय खाववे हेच कळत नाही. यात आपण प्रत्येक ऋतुनसार आहार केला पाहिजे. जेणे करून आपल्या शरीताला पोषणही मिळेल. उन्हाळ्यात घामावाटे पाणी निघून जाते. या उन्हाळ्यात कैरी बाजारात येता, या कैरीचे पन्हे बनविले जाते. आज आपण कैरीचा भात (raw mango rice recipe) बनविणार आहोत.

असा बनवा कैरीचा भाता

साहित्य
  • २ कैरी, स्वच्छ धुवून, किसून घ्या
  • भात देखील शिजवून घ्यावी (भात शिजवताना मीठ घाला)
  • 1 चमचा तेल
  • १/२ चमचा जिरे
  • १/२ चमचा मोहरी
  • १/२ चमचा चणाडाळ
  • १/२ चमचा उडीद डाळ
  • १/२ चमचा हळद
  • कडीपत्ता
  • कोथिंबीर

कृती

  • सर्वप्रथम गॅसवर एका पॅन ठेवा.
  • गॅस हा मंद आचेवर ठेवा.यानंतर पॅनमध्ये १ चमचा तेल टाका.
  • तेल गरम झाल्यावर १/२ चमचा मोहरी घाला.
  • १/२ चमचा जिरे, १/२ चमचा उडदाची डाळ, १/२ चमचा चण्याची डाळ टाकून हे सर्व भाजून घ्या.
  • यानंतर कडीपत्ता टाका आणि १/२ चमचा हळद टाका हे सर्व एकसारखे करून घ्या.
  • यात कच्चा कैरीचा किस टाकून परतून घ्या.
  •  सर्वात शेवटी भात टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
  •  आता आपला कैरी भात तयार झाला आहे.
  • कैरी भात एका भांड्यात काढून घ्या.
  • आता कैरी भातावर कोथिंबीर पेरून घ्या.
  • कैरी भात हा खाण्यासाठी तयार झाला आहे.

झटपट बनवा कोशिंबीर रेसिपी

- Advertisement -

 

साहित्य

  • 2 काकडी
  • 2 टोमॅटो
  • मीठ
  • कोथिंबीर

कृती

  • 2 काकडी बारीक चिरून घ्या
  • 2 टोमॅटो देखील बारीक चिरून घ्या
  • एका बाऊलमध्ये बारीक चिरलेली काकडी आणि टोमॅटो घ्या.
  • चवीप्रमाणे मीठ टाका
  • हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या
  • कोथिंबीर पेरून घ्या
  • सोपी कोशींबीर खाण्यासाठी तयार झाली

हेही वाचा – Prawns Rice Recipe : झणझणीत कोळंबी भात नक्की ट्राय करा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini