Thursday, February 22, 2024
घरमानिनीKitchenस्वयंपाकघरात काम करताना 'या' टिप्स जरूर फॉलो करा

स्वयंपाकघरात काम करताना ‘या’ टिप्स जरूर फॉलो करा

Subscribe

स्वयंपाकघरात काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जेवण करण्यासोबत स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. बऱ्याच घरात वर्किंग वूमन असल्याकारणाने स्त्रीला घरातील सर्वच कामे करून घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे अनेकदा सकाळी जेवण करताना चुका होत असतात. कधी मीठ जास्त पडते तर, कधी मसाला कमी पडतो. गृहिणीच्या याच समस्या लक्षात घेत आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्याने तुमचा स्वयंपाक चुटकीसरशी आणि चविष्ट बनेल.

Cooking Kitchen Images - Free Download on Freepik

- Advertisement -

मीठ जास्त झाल्यास काय कराल –
कधी कधी स्वयंपाक करताना घाई-गडबडीत जेवणात मीठ जास्त पडते. कोणत्याही पदार्थात मीठ जास्त झाल्यास दही, नारळाची पेस्ट किंवा ब्रेडचा वापर तुम्ही करू शकता. तसेच दही खात नसल्यास तुम्ही त्यात लिंबाचा रस अथवा तूपही टाकू शकता. असे केल्याने पदार्थातील खारटपणा कमी होईल आणि जेवणही चविष्ट बनेल.

तीखट जास्त झाल्यास –
जेवण करताना कधी कधी पदार्थात मीठासोबत तीखट मसालाही जास्त होतो. पदार्थ जास्त तीखट झाल्यास त्यात मलई किंवा माव्याची पेस्ट तुम्ही घालू शकता. याने भाजीचा तिखटपणा कमी होण्यास मदत मिळेल.

- Advertisement -

Serious Woman Cooking Stock Photos and Images - 123RF

करपलेले पदार्थ –
बऱ्याचदा एखादा पदार्थ बनविताना तो खालून जळतो. अशावेळी स्वयंपाक करताना भांडी जळू लागली तर पदार्थ दुसऱ्या भांड्यात काढून घ्या, असे केल्याने पदार्थाला वास येणार नाही आणि भांडीही जळणार नाहीत.

बीट सोलण्याची टिप –
बीटरूट सोलणे हे देखील स्वयंपाकघरातील एक मोठे काम आहे. यासाठी सर्वात प्रथम बीटस्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर छोट्या चमच्याने बीट खरडवून घ्या.

मिरची खराब होण्यापासून वाचवा –
अनेकदा मिरच्या लवकर खराब होतात. त्यामुळे तुम्हालाही मिरची सुकण्यापासून वाचवायची असेल, तर तिचे देठ काढून कोरड्या जागी ठेवा.


हेही वाचा ; उरलेल्या भाज्यांपासून बनवा कटलेट

- Advertisment -

Manini