Thursday, April 18, 2024
घरमानिनीKitchenRecipe : हेल्दी पालक स्वीट कॉर्न सँडविच

Recipe : हेल्दी पालक स्वीट कॉर्न सँडविच

Subscribe
दिवसाची निरोगी सुरुवात करण्यासाठी पालक सँडविच एक उत्तम ब्रेकफास्ट डिश आहे. आरोग्यदायी पालकापासून बनवलेले सँडविचही खूप चवदार असते. चला तर मग जाणून घेऊया हेल्दी पालक स्वीट कॉर्न सँडविच कसे बनवायचे हे पाहूया…

साहित्य

 • 1/2 किलो
 • स्वीट कॉर्न – 1/2 कप
 • चीज किसलेले – 1/2 कप
 • ब्रेड स्लाइस – 8
 • कांदा – 1 लसूण
 • 2-3 लवंगा हिरवी मिरची
 • धणे – 1 टेबलस्पून
 • काळी मिरी पावडर -1/2 टीस्पून
 • तेल – 1 चमचा
 • मीठ – चवीनुसार

Spinach Corn Sandwich | Sandwich Recipe - Candid Treat

- Advertisement -

कृती

 • पालक सँडविच बनवण्यासाठी सर्वातप्रथम पालकाचे देठ तोडून त्यांना चांगले धुवून घ्या.
 • यानंतर पालकाची पाने उकळा आणि नंतर पुन्हा थंड पाण्याने धुवा.
 • ब्लँच केलेला पालक बारीक चिरून घ्या. यानंतर, पॅनमध्ये स्वीट कॉर्न उकळून घ्या.
 • यानंतर त्यात कांदा आणि लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्या.
 • आता कढईत तेल त्यात बारीक चिरलेला कांदा व लसूण परतून घ्या.
 • साधारण एक मिनिट शिजल्यानंतर त्यात चिरलेला पालक घाला, मिक्स करून शिजू द्या.
 • थोडा वेळ शिजल्यानंतर त्यात चिरलेली हिरवी मिरची आणि उकडलेले कणीस घाला.
 • नंतर काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून सर्वकाही व्यवस्थित मिसळा.
 • आता तयार मिश्रण एका भांड्यात काढून त्यात किसलेले चीज घाला.
 •  मग दोन ब्रेड स्लाइसमध्ये तयार मिश्रण भरा. तसेच ब्रेडला बटर लावून सँडविच ग्रिलरमध्ये भाजून घ्या.
 • हे झाल्यावर सँडविच दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शिजवा.

________________________________________________________________________

हेही वाचा : Recipe : कांद्याच्या पातीची टेस्टी कोशिंबीर

 

- Advertisment -

Manini