15 ऑगस्ट 2023 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 7६ वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरातच साजरा केला जाणार आहे. अशातच तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबासोबत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव घरी तिरंगा केक बनवून साजरा करा. आता आपण जाणून घेऊया तिरंगा केकची पाककृती. तसेच यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे…
तिरंगा केक बनविण्यासाठी लागणारे साहित्य
- एक मोठे ब्रेडचे पॅकेट
- आंबा
- एक वाटी मलई
- पिठी साखर
- पेरूचा जॅम
- गुलाब पाणी
- सुका मेवा ( काजू, बदाम, पिस्ता)
तिरंगा केक बनविण्याची कृती
- केक बनवण्यासाठी सर्वात आधी मलई,साखर आणि गुलाबपाणी घालून हे मिश्रण चांगले फेटून घ्या.
- उरलेल्या साखरेत आंबा मिक्स करून चांगले फेटून घ्या.
- आता एका प्लेटमध्ये ब्रेड ठेवा आणि त्यावर आंब्याचे मिश्रण व्यवस्थित पसरवा.
- त्यानंतर त्यावर दुसरा ब्रेड ठेवून क्रीमचे मिश्रण पसरवा.
- आता त्यावर ब्रेडचा तिसरा स्लाइस ठेवा. या नंतर त्यावर जाम लावून घ्या.
- हे झाल्यावर चौथ्या ब्रेड स्लाइसला क्रीमचे मिश्रण लावा.
- आता सजावटीसाठी त्यावर काजू, बदाम आणि पिस्ता यांचे काप लावा.
- हा केक सुंदर बनवण्यासाठी त्याचे मधून दोन भाग करा.
- तुमचा हा केक तीन रंगात दिसेल.
- आता ही केक रेसिपी कुटुंबातील सदस्यांसोबत सर्व्ह करा.
हेही वाचा :
Recipe : 15 ऑगस्टला घरी बनवा तिरंगा पुलाव
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -