उन्हाळ्यात लिंबूला विशेष असे महत्व आहे. लिंबू हा शरीरासाठी उत्तम मानला जातो. पावसाळ्यात बाजारात कमी किमतीत भरपूर लिंबू मिळतात. तर उन्हाळ्यात लिंबू अत्यंत कमी आणि महागड्या दरात मिळतात. अशा परिस्थितीत महागाई टाळण्यासाठी लोक लिंबूचा साठा करून ठेवतात.
परंतु लिंबू जास्त काळ साठवून ठेवल्याने ते खराब होऊ लागतात, तसेच सुकतात, त्यामुळे बहुतेक लोकांना ते जास्त काळ साठवता येत नाही. तुम्हालाही येत्या पावसाळ्यासाठी लिंबू साठवायचे असतील तर या स्टोरेज टिप्स फॉलो करा.
- Advertisement -
अशाप्रकारे करा लिंबाची साठवणूक-
- लिंबाचा रस साठवण्यासाठी १ किलो लिंबाचा रस काढून एका बरणीत गाळून घ्या.
- आता जर तुमचा लिंबाचा रस 500 ग्रॅम असेल तर जारमध्ये 600 ग्रॅम साखर घाला.जेणेकरून हा रस खराब होणार नाही.
- लिंबू जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी सर्व लिंबू स्वच्छ धुवा आणि सुती कापडाने पुसा.
- ब्राऊन रंगाच्या कागदाच्या पिशवीत किंवा टिश्यू पेपरमध्ये लिंबू ठेवल्याने ते दीर्घकाळ टिकतात.
- याशिवाय जर ब्राऊन रंगाचा कापडी पेपर नसेल तर घट्ट प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवा.
- हा बॉक्स फ्रीजमध्ये ठेवा आणि आवश्यकतेनुसार लिंबू वापरा.
- लिंबू ३-४ महिने साठवून ठेवायचे असेल तर लिंबूचे चार तुकडे करून काचेच्या बरणीत ठेवावे.
- तसेच लिंबू लवकर खराब होणार नाही म्हणून बरणीत मीठ टाकावे.
- लिंबू बरणीत ठेवल्यानंतर काही दिवसांनी त्याचा रंग बदलेल पण खाण्यासाठी हे लिंबू ताजे असतील.
- लिंबू दोन महिने ताजे ठेवण्यासाठी, सर्व लिंबांमध्ये खोबरेल तेल चांगले लावा आणि ते एका काचेच्या बरणीत ठेवा .
- खोबरेल तेल लावल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवा.
- तेल लावल्याने लिंबू लवकर खराब होत नाहीत.
हेही वाचा : Recipe: पेरूचे आंबट गोड लोणचे नक्की ट्राय करा
- Advertisement -
- Advertisement -