Saturday, April 20, 2024
घरमानिनीKitchenRava Nuggets Recipe : नाश्त्याला बनवा कुरकूरीत रव्याचे नगेट्स

Rava Nuggets Recipe : नाश्त्याला बनवा कुरकूरीत रव्याचे नगेट्स

Subscribe

रवा हा पदार्थ जेवणात सर्रास वापरला जातो. तसेच रव्यापासून कुरकूरीत नगेट्स घरी नक्की ट्राय करा. रव्यापासून नेहमी उपमा आणि इतर पारंपारिक डिश बनवण्याऐवजी काहीतरी वेगळं खायला सगळ्यांनाच आवडेल. पण, वेळ आणि पदार्थ बनवायला लागणारी सामग्री यामूळे नवे काही बनवणे कठीण काम वाटते. अशातच कुरकूरीत रव्याचे नगेट्स घरी करून बघा. जाणून घ्या साहित्य आणि कृती…

Potato nuggets recipe | Steffi's Recipes

- Advertisement -

साहित्य-

  • रवा – 1 कप
  • ताजे वाटाणे – 1 कप
  • उकडलेले बटाटे – 3
  • हिरवी कोथंबिर – 2 ते 3 चमचे
  • हिरवी मिरची – 2
  • हळद – 1/2 टीस्पून
  • धने पावडर – 1.5 टीस्पून
  • लाल तिखट – 1/ 2 टीस्पून
  • आमचूर, – 1/2 टीस्पूनगरम मसाला – ½, टीस्पून
  • मीठ – 1. टीस्पून
  • तळण्यासाठी तेल

Instant Suji Snack | Sooji Nuggets | Sooji ka Nasta/Sooji snack/Tea time snacks recipes/ Rava recipe - YouTube

- Advertisement -

कृती-

  • प्रथम रव्याचे पीठ तयार करून घ्या. नंतर एका भांड्यात 2 कप पाणी घाला.
  • त्यात चवीनूसार मीठ आणि 2 चमचे तेल घाला.
  • मध्यम आचेवर पाणी उकळू लागेपर्यंत झाकून ठेवा.
  • सतत ढवळत राहा, मंद आचेवर रवा घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • रवा घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. थोडासा थंड होऊ द्या.
  • थोडासा थंड होऊ लागला आणि हाताने मळून घेता येईल.
  • सारणासाठी उकडलेले बटाटे सोलून. भांड्यात काढून चमच्याने मॅश करा.
  • आता एका कढईत तेल गरम करा.

1/2 कप सूजी से बनाये कुरकुरा नाश्ता की आप फ्रेंच फ्राइज भूल जाएँगे | Suji Recipe | CookwithND - YouTube

  • यानंतर त्यात मटार टाका आणि 2 ते 3 मिनिटे शिजवा जेणेकरून वाटाणे पूर्णपणे शिजून मऊ होतील.
  • या मिश्रणात आता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
  • 1.5 टीस्पून धणे पावडर त्यात हळद, लाल मिरची पावडर, आणि मीठ, गरम मसाला आणि थोडी हिरवी धणे घालून मिक्स करावे.
  • हे मिश्रण थोडे परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात मॅश केलेले बटाटे घालून मिक्स करून गॅस बंद करा.
  • मिश्रण थंड झाल्यावर हाताने मिश्रणाला गोल आकार द्या आणि प्लेटमध्ये ठेवा.
  • आता रव्याच्या पिठाचा एक गोळा घेऊन त्यालाउभट किंवा गोलाकार आकार द्या.
  • त्यात बनवलेले बटाट्याचे सारण भरा.
  • सगळ्या मिश्रणाचे गोळे तयार करून घ्या. तेल मध्यम गरम झाल्यावर त्यात बनवलेले रव्याचे गोळे टाका.
  • तयार नगेट्स गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.
  • तयार झालेले नगेट्स हिरवी पूदीना चटणीसोबत सर्व्ह करा.

हेही वाचा : Veg Noodles Recipe : चमचमीत व्हेज हक्का नुडल्स

- Advertisment -

Manini