सणासुदीला गोड पदार्थांना बाजारात अतिशय मागणी असते. तसेच हे पदार्थ विकत घेताना आपल्याला मनाला देखील भीती वाटत असते. ती म्हणजे बाहेरचे गोड पदार्थ चांगले असतील की नाही याबद्दल आपल्याला नेहमी शंका असते. तसेच माव्यामध्ये अनेक भेसळयुक्त गोष्टींचा समावेश असतो ज्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया खवा नाही तर बनवा बिस्कीटा पासून गुलाबजाम घरच्या घरी कसे बनवायचे…
साहित्य
- साखरेचा पाक
- दोन ते तीन पॅकेट मेरी गोल्ड बिस्किटे
- वेलची पावडर
- तूप दोन ते तीन चमचे
- तळण्यासाठी तेल
- Advertisement -
कृती
- बिस्किटांपासून गुलाबजाम बनवण्यासाठी प्रथम मेरी बिस्किटांचे छोटे तुकडे करा.
- यानंतर हे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- याची पेस्ट तयार झाल्यावर एका मोठ्या भांड्यात ही पेस्ट काढून घ्या.
- त्यात दोन चमचे तूप घालून पेस्ट चांगली मिक्स करून घ्या.
- आता या पिठात अर्धा चमचा वेलची पूड घाला आणि चांगले मिसळा.
- यानंतर या पिठात दूध घालून सगळं नीट मिक्स करा आणि मऊ पीठ मळून घ्या.
- हे पीठ नीट मिक्स केल्यानंतर या पिठात गोल गुलाबजाम तयार करून प्लेटमध्ये ठेवा.
- आता कढईत तेल गरम करा, तेल गरम झाले की त्यात गुलाबजाम तळून घ्या.
- गुलाब जामुन सोनेरी होईपर्यंत तळून घ्या आणि एका प्लेटमध्ये बाजूला ठेवा.
________________________________________________________________________हेही वाचा : Recipe : सफरचंद मालपुवाची सोप्पी रेसिपी