गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत. तसेच बाप्पाला प्रसादासाठी तुम्ही शेंगदाणे आणि खजुराचे लाडू देखील बनवू शकता. शरीरासाठी शेंगदाणे आणि खजुर अतिशय फायदेशीर आणि पौष्टिक आहेत. जाणून घेऊया शेंगदाणे आणि खजुराचे लाडू.
साहित्य
- 2 वाट्या शेंगदाणे.
- 3 वाट्या खजूर.
- 2 टी स्पून.
- साजूक तूप.
- वेलदोड्याची पूड
कृती
- शेंगदाणे सालं निघतील इतपत भाजून घ्यावे.
- खजूर स्वच्छ धुवून, पुसून त्यातील बी काढून टाकावे.
- सालं काढून शेंगदाण्याचा कूट करून घ्यावा.
- कढईत तूप टाकावं. त्यावर खजुराचे तुकडे टाकावे.
- हळूहळू परतावे. खजूर मऊ होईल इतपतच परतावे.
- आता खजूर, शेंगदाण्याचा कूट एकत्र करावं.
- त्यावर वेलदोडा पूड टाकावी. सर्व एकत्र मिसळून लाडू वळावे.
- शेंगदाण्याचं कूट फार बारीक करू नये.
- Advertisement -
________________________________________________________________________
हेही वाचा : Milk Barfi : बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा दूधाची बर्फी
- Advertisement -
- Advertisement -