Friday, April 19, 2024
घरमानिनीKitchenबदाम खरे की नकली, ओळखा 'या' टिप्सद्वारे

बदाम खरे की नकली, ओळखा ‘या’ टिप्सद्वारे

Subscribe

ड्रायफ्रुटस मधला महत्वाचा पदार्थ म्हणजे बदाम. बदाम हे फळ लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण खातात. बदामात असेलेले पौष्टिक घटक शरीराला ऊर्जा देतात. बुद्धीला चालना देण्यासाठी बदामाचे सेवन अतिशय उपयुक्त आहे. अनेकवेळा आपण बदाम निवडताना दुर्लक्षितपण करतो. अशावेळी नकली किंवा भेसळयुक्त बदाम खाऊन तुम्ही आजारी पडू शकता. अनेकांना खरे बदाम कसे ओळखायचे हे माहित नसते. तर आता आपण खरा आणि नकली बदाम सहज कसे ओळखावे हे पाहणार आहोत.

Why are almonds healthier when soaked and peeled | HealthShots

- Advertisement -

1. रंगानुसार ओळखा-

वास्तविक बदाम ओळखण्यासाठी बदामाचा रंग काळजीपूर्वक पहा. बनावट बदामांचा रंग खऱ्या बदामापेक्षा किंचित गडद दिसतो. तसेच, त्याची चव देखील सौम्य कडू असते. दुसरीकडे, जर तो खरा बदाम असेल तर त्याच्या वरची साल हलकी तपकिरी असेल. याशिवाय खरे बदाम काही तास पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर त्याची साल सहज काढता येते आणि हे बदाम चवीला कडवट लागत नाहीत.

- Advertisement -

2. तळहातावर बदाम घेऊन पहा-

जर तुम्ही बदाम विकत घेणार असाल तर नकली बदाम ओळखण्यासाठी आधी बदाम तळहातावर घासण्याचा प्रयत्न करा. बदामाचा तपकिरी रंग हातातून निघू लागला तर समजा बदाम बनावट आहे आणि त्यावर पावडर शिंपडली आहे किंवा भेसळ आहे.

3. बदाम घेताना कागदावर दाबून बघा-

बदामाच्या आत एक नैसर्गिक तेल असते. ज्यामध्ये पोषण देखील खूप जास्त आहे. जर तुम्ही बदाम खरेदी करणार असाल तर खरे बदाम ओळखण्यासाठी कागदावर थोडे बदाम दाबून पहा, जर त्यात पुरेसे तेल असेल तर बदाम कागदावर तेलाचे डाग सोडतील. दुसरीकडे बदामाला पॉलिश केले असल्यास तळहातावर रंग पुसटसा लागतो.

4 Reasons Why Almonds Are Good for You – Cleveland Clinic

बदाम खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा-

  • बदाम कधीही बाजारातील उघड्यावरचे घेऊ नका.
  • बदामाला जास्त हवा लागल्यास त्याची चव जाते. त्यामुळे तसे बदाम घेऊ नका.
  • नेहमी हलक्या वजनाचे बदाम खरेदी करा.
  • बदाम विकत घेताना त्यावर छिद्र नसावी.

हेही वाचा : kitchen hacks : कुकरमध्ये बनवा परफेक्ट केक, ‘या’ टिप्स करा फॉलो

 

- Advertisment -

Manini