पावसाळा असो की उन्हाळा किंवा हिवाळा भजी खाण्याची वेगळीच मजा आहे. यामुळे आपल्याकडे पावसाळा व्यतिरिक्त खास बेताच्या दिवशी कांदा भजी, बटाटा, मूग, पालक अशी विविध प्रकारची भजी आवडीने बनवली जातात आणि खाल्लीही जातात. पण आपण आज उरलेल्या भाताची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत.
साहीत्य- दोन वाट्या उरलेला भात, तीन वाट्या बेसन, तीन वाट्या तांदळाचे पीठ,अर्धी वाटी बारीक चिरेलला कांदा, अंदाजे हळद, चवीनुसार मीठ, तिखट , ओवा, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर,धनेपूड, जिरेपूड, तळणासाठी तेल.
कृती- सर्वात आधी मोठ्या पातेल्यात किंवा बाऊलमध्ये भात घट्ट कुस्करुन घ्यावा. नंतर त्यात बेसन. तांदळाचे पीठ आणि वरील सर्व पदार्थ टाकावेत. मिश्रण हाताने एकजीव करून घ्यावे. कढईत गरम तेल करुन त्यात भज्याप्रमाणे सोडावे. लालसर होईपर्यंत खमंग तळून घ्यावेत. हिरव्या , लाल चटणीबरोबर खाण्यास द्यावेत.