पिठाचे अप्पे आपण सगळेच खातो. पण मिक्स डाळीचे अप्पे चवीला सुद्धा टेस्टी लागतात. मिक्स डाळीचे अप्पे खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. घरात झटपट तुम्ही बनवू शकता मिक्स डाळीचे कुरकुरीत अप्पे. जाणून घ्या साहित्य आणि कृती….
साहित्य
- 1 कप- तांदूळ.
- अर्धा कप- चण्याची डाळ.
- पाव कप- उडीद डाळ.
- पाव कप-तूर डाळ.
- पाव कप – मसूर डाळ .
- पाव कप – मूग डाळ.
- अर्धा टीस्पून मेथी दाणे.
- 1 लहान कांदा – बारीक चिरलेला.
- 7-8हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या.
- 10-12 कढीपत्ता बारीक चिरलेल्या.
- अर्धा टीस्पून जिरे.
- अर्धा टीस्पून हिंग.
- मीठ चवीपुरते.
कृती
- सगळ्या डाळी , तांदूळ आणि मेथी दाणे स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे .
- सकाळी पाणी काढून बारीक वाटावे . डाळी वाटण्यासाठी अर्धा कप पाणी वापरा.
- या पेस्टमध्ये कांदा, हिरव्या मिरच्या , कढीपत्ता , जिरे , आणि हिंग घालीन एकत्र करून घ्यावे .
- पाव कप पाणी आणि चवीपुते मीठ घालून पीठ जरासे सरसरीत करावे . पीठ खूप पातळ नको .
- आता आप्पेपात्र माध्यम आचेवर चांगले गरम करून घ्यावे .
- त्या छिद्रांत तेल घालावे . नंतर मिश्रण या छिद्रांत घालावे . आच मंद करून झाकण घालून शिजू द्यावे .
- साधारण ४ मिनिटानंतर खालच्या बाजूने आप्पे हलक्या करड्या रंगावर आले की उलटावे .
- उलटण्यापूर्वी थोडे तेल वरून घालावे .
- दुसऱ्या बाजूने थोडे कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यावेत.
- गरमागरम आप्पे चटणीसोबत किंवा टोमॅटो केच अप सोबत वाढावेत.
हेही वाचा : Cutlet : नाश्त्यामध्ये बनवा मिक्स कडधान्याचे हेल्दी कटलेट
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -