आंबा,कैरी याचे लोणचे आपण नेहमी खातोच. अशातच खजुराची चटणी देखील आपण बनतो. पण खजुराचे लोणचे तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर आता नक्की ट्राय करा. खजूर हा शरीराला चांगला असतो. याशिवाय खजुराचे लोणचे देखील शरीरासाठी उत्तम आहे.
साहित्य-
- अर्धा किलो बी नसलेला खजूर घ्या.
- 12 लिंबू
- 3 चमचे लाल तिखट
- दीड वाटी गूळ
- अर्धा चमचा शेंदेलोण
- अर्धा चमचा पादेलोण
- 1 चमचा जिरे पावडर
- अर्धा चमचा साधं मीठ
- Advertisement -
कृती-
- एका खजुराचे चार तुकडे होतील असे तुकडे करा.
- नंतर लिंबाचा रस काढून घ्या आणि गूळ बारीक चिरुन घ्या.
- हे झाल्यानंतर स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात खजूर, गूळ, लिंबाचा रस, शेंदेलोण, पादेलोण, मीठ, तिखट आणि जिरे पावडर सर्व एकत्र करा.
- हे मिश्रण एक दिवस तसंच ठेवून द्या ज्यामुळे ते चांगले मुरेल.
- जेवढं छान मुरेल तेवढी चव छान होईल.
- हे लोणचं लगेच दुसऱ्या दिवशी खायला तुम्ही खाऊ शकता.
- Advertisement -
हेही वाचा : Aloo Momos : बटाट्याचे चविष्ट मोमोज, जाणून घ्या सोपी रेसिपी