रोज एकाच प्रकारची डाळ खाऊन खूप कंटाळा येतो. तर तडका डाळ ही भातासोबत खायला खूप छान लागते. त्यामुळे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ढाबा स्टाईल तडका डाळ नक्की ट्राय करा.
साहित्य-
- 1 चमचा तेल
- 1 टीस्पून बटर
- 1 टीस्पून मोहरी
- 1 टीस्पून जिरे
- 3 सुक्या लाल मिरच्या
- 15-20 मेथी दाणे
- 1 टीस्पून आले लसूण क्रश
- 15-20 कढीपत्ता
- 1 कांदा लांब चिरलेला
- 1 टोमॅटो बारीक चिरलेला
- 1 कप तूर डाळ
- 2 चमचे मूग डाळ
- 2 चमचे मसूर डाळ
- 1/4 चमचा हळद पावडर
- 1/4 टीस्पून हिंग
- 1 चमचा मिक्स मसाला
- पाणी (प्रमाणानुसार) / चवीनुसार मीठ / कोथिंबीर
- Advertisement -
कृती-
- सर्वप्रथम कुकरमध्ये हळद आणि हिंग घालून सर्व डाळी दिलेल्या प्रमाणानुसार एकत्र करून घ्या. त्याच्या 3 शिट्या देऊन शिजवून घ्या.
- ही डाळ एका बाऊलमध्ये बाजूला काढून ठेवा फोडणी तयार करण्यासाठी पॅनमध्ये तेल आणि बटर एकत्र गरम करा.
- पहिल्यांदा मोहरी, जिरे, सुक्या लाल मिरच्या, मेथी दाणे, आले लसूण ठेचून, कढीपत्ता आणि कोथिंबीर घाला आणि फोडणी द्या.
- ही फोडणी शिजत आल्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो आणि मीठ घाला.
- हे देखील शिजल्यावर पाव चमचा हळद, लाल तिखट, धणे पावडर घाला आणि अजून 2 मिनिटे शिजवून घ्या.
- मसाले देखील परतल्यावर डाळ घाला. डाळीत तडका मुरल्यावर डाळ जितकी पातळ हवी आहे तितके पाणी घाला आणि चांगली उकळवून घ्या.
- एका दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करा त्यात जिरे पावडर, धणे पावडर आणि मीठ घाला चांगले मिसळा आणि फोडणीच्या वरून डाळीवर घाला.
- यानंतर डाळीवर झाकण ठेवून डाळ 5 मिनिटे तसेच ठेवा.
- सर्व्ह करताना त्यावर बटर आणि कोथिंबीर घालून सजवा आणि गरम जिरा राईस सोबत सर्व्ह करा.
हेही वाचा : Recipe : झटपट बनवा पौष्टिक केळीचे काप
- Advertisement -
- Advertisement -