दोडकं अनेकांना आवडत नाही. पण तुम्ही गावरान पद्धतीने दोडक्याची भाजी बनावलात तर नक्कीच सर्वांना आवडेल. तसेच सगळेजण ही भाजी आवडीने खातील. जाणून घेऊया गावरान पद्धतीची दोडक्याची भाजी कशी बनवायची.
साहित्य
- 3-4 दोडके
- 2 कांदे स्लाइसमध्ये कापलेले
- 2 टोमॅटो चिरलेले
- 3-4 लसूण पाकळ्या
- 1 आल्याचा तुकडा
- 3 हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर बारीक चिरलेली
- 2 ते 3 चमचे देशी तूप
- 1 चमचा जिरे
- 1/2 चमचा बडीशेप
- 1/ 4 चमचा हिंग
- हळद
- लाल तिखट
- धने पावडर
- चवीनुसार मीठ
कृती
- भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम दोडके चांगले धुवून सोलून घ्या.
- नंतर त्याचे चौकोनी तुकडे करा. त्यांना थोडे जाड कापून घ्या, जेणेकरून ते सहज शिजतात.
- आता कढईत देशी तूप टाकून गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे टाका.
- बडीशेप आणि हिंग एकत्र घाला आणि जिरे लाल झाल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण घाला.
- लसूण थोडा शिजला की हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून टाका.
- सोबत चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.
- कांदा ब्राऊन झाला की त्यात धनेपूड, हळद, लाल तिखट टाका.
- चांगले मिक्स करा. आता मसाल्यांसोबत चिरलेले दोडके घाला.
- मंद आचेवर शिजवा, म्हणजे दोडक्याचे पाणी सुकून भाजी चांगली शिजली जाईल.
- शिजायला लागल्यावर टोमॅटोचे तुकडे टाका. चवीनुसार मीठ घालून झाकून ठेवा.
_________________________________________________________________
हेही वाचा : घरी बनवा स्ट्रीट स्टाईल पावभाजी
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -