Thursday, February 22, 2024
घरमानिनीKitchenRecipe : ड्राय चिली पनीर

Recipe : ड्राय चिली पनीर

Subscribe

ड्राय चिल्ली पनीर हा एकमेव असा पदार्थ आहे जो सगळ्यांना खूप आवडतो. जेव्हा जेव्हा आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा हा पदार्थ बरेच लोक ऑर्डर करतात. अशातच आता आपण घरच्या घरी ड्राय चिली पनीर कसा बनवायचा हे जाणून घेणार आहोत. अगदी पटकन होणारी ड्राय चिली पनीरची रेसिपी कशी होईल हे आपण पाहूया तसेच याला लागणारे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे…

साहित्य 

12-15 पनीर क्युब्स
5 टेबलस्पून कॉर्न फ्लोर
2 टेबलस्पून मैदा
1/5 टीस्पून काली मिर्च
1 टीस्पून मीठ
1/2 कप पाणी
1 टेबलस्पून तेल
1 टेबलस्पून लसूण
1 टेबलस्पून आले
2 चमचे हिरव्या मिरच्या
1 टीस्पून कांदा
1 टीस्पून हिरवी शिमला मिरची
1 टीस्पून लाल शिमला मिरची
1/2 टीस्पून रेड चिली सॉस
1 टीस्पून सोया सॉस
1/2 टीस्पून व्हिनेगर

- Advertisement -

Paneer Chilli Recipe - How to make Chilli Paneer at Home - KFC Recipe

कृती 

  • सर्वातप्रथम एका बाऊलमध्ये पनीर घ्या.
  • यानंतर कॉर्नफ्लोर, मैदा, काळी मिरी आणि मीठ त्यात घाला.
  • हे झाल्यावर त्यात थोडे पाणी घालून चांगले मिक्स करा.
  • मग पनीर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.
  • आता कढईत तेल घेऊन त्यात लसूण आणि आलं बारीक करून घाला.
  • यानंतर थोडे परतून त्यात हिरवी मिरची व कांदा घाला.
  • आता हे सगळं एकत्र परतून घ्या आणि त्यात लाल शिमला मिरची आणि हिरवी शिमला मिरची घाला.
  • आता त्यात तळलेले पनीर आणि त्यानंतर लाल चिली सॉस, सोया सॉस आणि व्हिनेगर घाला.
  • हे सर्व साहित्य नीट एकत्र परतून घ्या.
  • ड्राय चिली पनीर खाण्यास तयार आहे.

हेही वाचा : Receipe : काबुली चन्याचे टेस्टी कबाब

- Advertisment -

Manini