कलिंगड हे आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले फळ आहे. तसेच वॉटरमेलन स्लश हे एक हाइड्रेटिंग आणि रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. लहान मुलांनी तसेच महिलांनी हेल्दी वॉटरमेलन स्लशचे सेवन केल्यास त्यांना उपयुक्त फायदे मिळतात. अशातच आता जाणून घ्या हेल्दी वॉटरमेलन स्लश कसा बनवायचा.
साहित्य
- ¼ कप कापलेले आले.
- ¼ कप पाणी.
- 4 कप बारीक कापलेले कलिंगड.
- गार्निशिंगसाठी वारिक कोथिंबीर
- 3-4 बर्फाचे तुकडे
- फ्रूट मसाला
कृती
- एका पॅन मध्ये मंद आचेवर आल्याचे तुकडे आणि पाणी उकळत ठेवा.
- आता हे मिश्रण उकळवून झाल्यावर याला एक मिनिट ढवळून घ्या.
- नंतर हे थंड होऊ द्या आणि एका भांड्यात गाळून घ्या.
- कलिंगड आणि आल्याच्या या काढ्याला मिक्स करा.
- हे झाल्यावर पुदिनाची पाने यामध्ये टाका आणि हे ड्रिंक गार्निश करा.
- आता मस्तपैकी वॉटरमेलन स्लॅशचा आस्वाद घ्या.
हेही वाचा :
Lemon Iced Tea Recipe: घरी ट्राय करा लेमन आइस्ड टी
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -