Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Kitchen Recipe : घरी बनवा मार्केटसारखे Ice Cream

Recipe : घरी बनवा मार्केटसारखे Ice Cream

Subscribe

आईसक्रीम म्हटल्यावर कोणाला नाही आवडत अस कधी होतच नाही. सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून थंडरगार पेय किंवा आईसक्रीम सगळ्यांना खावेसे वाटते. अशातच आपण आपल्या हव्या त्या फ्लेवरनुसार आईसक्रीम बनवून खाऊ शकतो. तसेच आईसक्रीम बनविण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आईसक्रीमची ही रेसिपी नक्की ट्राय करा.

Cottage cheese (paneer) ice cream is going viral — find out if it actually comes with any health benefits | Lifestyle News,The Indian Express

- Advertisement -

साहित्य-

 • 250 व्हीप्ड क्रीम किंवा डेअरी असलेली क्रीम
 • दिड कप कंडेन्स्ड दूध,
 • दोन चमचे कोको पावडर,
 • 10/12 भाजलेले बदाम
 • चॉकलेट (फ्लेवरनुसार)
 • अर्धा चमचा दालचिनी (चवीनुसार)

17 Best Ice Cream Sundae Recipes - Easy Toppings and Ideas for Ice Cream Sundaes

- Advertisement -

कृती-

 • 250 ग्रॅम व्हीप्ड क्रीम किंवा डेअरी क्रीम घ्या.
 • सोबत दीड कप कंडेन्स्ड दूध, दोन चमचे कोको पावडर घ्या
 • पन्नास ग्रॅम भाजलेले बदाम, चॉकलेट चिप्स, अर्धा चमचा दालचिनी पावडर.
 • आईस्क्रीम बनवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. क्रीम चांगली फेटून घ्या.
 • क्रीम नीट फेटल्यावर ते फुगीर होईल तसेच त्याचे अधिक दिसू लागेल.
 • त्यानंतरच त्यात इतर घटक मिक्स करा.
 • या नंतर दुसऱ्या भांड्यात कंडेन्स्ड मिल्क घ्या.
 • त्यात कोको पावडर गाळून टाका.
 • नंतर कंडेन्स्ड मिल्क आणि कोको पावडर मिक्स करा.
 • तसेच दोन चमचे मलई घाला.
 • या तीन गोष्टी नीट मिक्स केल्यानंतर उरलेली व्हीप्ड क्रीम घालून मिक्स करा.
 • आता दालचिनी आणि चोको चिप्स आणि बारीक केलेले भाजलेले बदाम मिक्स करा.
 • यानंतर आईस्क्रीम एका भांड्यात सेट करण्यासाठी ठेवा आणि आठ ते दहा तास डीप फ्रीजरमध्ये ठेवा.
 • हे आईस्क्रीम पूर्णपणे गोठल्यावर बाहेर काढा आणि एका भांड्यात घेऊन ड्रायफ्रुट्स घालून सर्व्ह करा.

हेही वाचा : ‘या’ पदार्थांचे करा सेवन,चाळिशीतही दिसाल तरुण

 

 

- Advertisment -

Manini